शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

प्रिशा शिंदेचा जान्हवी काजलावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:16 IST

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेतर्फे (एमएसएलटीए) आयोजित पंधराव्या एमएसएलटीए रमेश देसाई स्मृती बारा वर्षांखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस ...

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेतर्फे (एमएसएलटीए) आयोजित पंधराव्या एमएसएलटीए रमेश देसाई स्मृती बारा वर्षांखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित प्रिशा शिंदे हिने राजस्थानच्या चौथ्या मानांकित जान्हवी काजलाचा 6-4, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या आयुश पुजारी याने आपली विजयी मालिका कायम ठेवत उत्तर प्रदेशच्या अनुज सरडाचा 6-2, 7-5 असा पराभव करून आगेकूच केली. दिल्लीच्या तिसऱ्या मानांकित ओजस मेहलावट याने महाराष्ट्राच्या ओम वर्माचा 6-2, 6-1 असा तर, हरियाणाच्या दुसऱ्या मानांकित आरव चावलाने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या शिवतेज शिरफुलेचा 6-4, 6-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राच्या चौदाव्या मानांकित अमोघ दामले याने उत्तर प्रदेशच्या सानिध्य व्दिवेदीचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(2) असा पराभव केला.

मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या मेहक कपूर हिने शान्विथा नुकालाचे आव्हान 6-1, 6-1 असे संपुष्टात आणले. तिसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या हरिथाश्री वेंकटेश हिने आपली राज्य सहकारी जीडी मेघनाचा 6-4, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व(मुख्य ड्रॉ)फेरी : मुले :आयुश पुजारी, महाराष्ट्र वि.वि. अनुज सरडा, उत्तरप्रदेश 6-2, 7-5,ओजस मेहलावट, दिल्ली (3) वि.वि. ओम वर्मा, महाराष्ट्र 6-2, 6-1,आरव चावला, हरियाणा (2) वि.वि. शिवतेज शिरफुले, महाराष्ट्र 6-4, 6-0,अमोघ दामले, महाराष्ट्र, (14) वि.वि. सानिध्य व्दिवेदी, उत्तरप्रदेश 6-3, 7-6 (2), मुली :

मेहक कपूर, महाराष्ट्र, वि.वि. शान्विथा नुकाला 6-1, 6-1, हरिथाश्री वेंकटेश, कर्नाटक, (3) वि.वि. जीडी मेघना, कर्नाटक 6-4, 6-3,प्रिशा शिंदे, महाराष्ट्र, (5) वि.वि. जान्हवी काजला, राजस्थान, (4)6-4, 6-1, माया राजेश्वरन, तामिळनाडू, (2) वि.वि. स्निग्धा कांता, कर्नाटक, (6) 6-1, 6-2,

दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुली :हरिथाश्री वेकंटेश-माया राजेश्वरन वि.वि.अहाना-सना वर्धमानी 6-0, 6-1,स्निग्धा कांता-जीडी मेघना वि.वि. खुशी गौर/नंदिनी कंसल 6-1, 6-1,ह्रितिका कपले-आराध्या वर्मा वि.वि. शान्विथा नुकाला-मृणाल शेळके 7-6(1), 2-6, 10-2,

मुले: ओजस मेहलावत-आरव चावला (1) वि.वि. मनन अगरवाल-आयुष पुजारी 6-0, 6-4,श्लोक चौहान-देव पटेल वि.वि. अद्वित तिवारी-अम्रित वत्स 6-1, 6-1,द्रोण सुरेश-तविश पाहवा (4) वि.वि. नील केळकर-ओम वर्मा 4-6, 6-3, 10-6,प्रतिक शेरॉन-रुद्र बाथम (2) वि.वि. प्रकाश सुरेश-फझल अली मीर 6-2, 5-7, 10-4,