बंडगार्डन : आयुर्वेद उपचार केंद्र आणि मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याचे आज रात्री पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये उघडकीस आले. त्यामध्ये नऊ तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, पार्लर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जहांगीर रुग्णालयासमोरील बसस्थानकाच्या मागे असलेल्या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये शॉप नं.९मध्ये संजीवनम आयुर्वेदिक केंद्राच्या नावाखाली बेकायदा मसाज पार्लर सुरू आहे. त्या ठिकाणी पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची तक्रार भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी रात्री आठ वाजता छापा टाकला. त्यामध्ये या ठिकाणी हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी या ठिकाणी येऊन तरुणींना ताब्यात घेतले.(वार्ताहर)
मसाज पार्लरवर छापा
By admin | Updated: May 23, 2014 04:49 IST