शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिवनगर विद्या प्रसारकच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्यपद रद्द

By admin | Updated: March 4, 2016 00:32 IST

माळेगाव सहकारी साखर कारखाना संचलित शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र मोहन

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखाना संचलित शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र मोहन वाबळे यांच्या प्राचार्यपदाची मान्यता तंत्रशिक्षण संचालकांनी पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे केंद्रीय सचिव दशरथ राऊत यांनी तब्बल ९ वर्षे पाठपुरावा केल्यानंतर हा आदेश दिला आहे. या संस्थेचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार तहहयात अध्यक्ष आहेत. त्यांच्या नावाचा गैरवापर करून तत्कालीन उपाध्यक्ष, विश्वस्त, कारखान्याचे संचालकांनी नियमबाह्य काम केले आहे, असा आरोप राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, प्रवक्ता विष्णू चव्हाण उपस्थित होते. राऊत यांनी या संस्थेच्या अंतर्गत सुरू असलेल्या महाविद्यालयांच्या बाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये शासकीय बिंदूनियमावलीनुसार ५१ टक्के आरक्षित जागांवर मागासवर्गीय, विमुक्त भटक्या, इतर मागासवर्गीयांच्या जागा भरलेल्या नाहीत. ९ वर्षांपूर्वी राऊत यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर माहिती अधिकाराचा वापर करून सर्व माहिती संकलित केली. त्यांच्या तक्रारीनुसार शासनाने चौकशी समिती नेमली. त्याच्या अहवाल समितीने सादर केला. मात्र, त्यावर कार्यवाही करण्यात आली नव्हती. समितीने सादर केलेल्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे आदेश १९ मार्च २०१५ आणि २८ मार्च २०१५ रोजी दिले होते. या आदेशाला अनुसरून प्राचार्य वाबळे यांना खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी सादर केलेला खुलासा अमान्य करण्यात आला. सन १९९३ च्या अध्यादेशानुसार पूर्वलक्षी प्रभावाने राजेंद्र वाबळे शैक्षणिक पात्रता व अनुभव धारण करीत नसल्यामुळे प्राचार्यपदाच्या १९९७ च्या नियुक्तीस ११ जून १९९८ अन्वये दिलेली मान्यता पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)