पुणे : मार्केट यार्डात रविवारी पेरू, बोरे, लिंबू, कलिंगड, खरबूज आणि पपईच्या दरात वाढ झाली. तर, चिक्कूच्या दरात घट झाली आहे. अननस, डाळींब, स्ट्रॉबेरी, संत्रा, मोसंबी आाणि द्राक्षांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, मोसंबी ३५ ते ४० टन, संत्री ३५ ते ४० टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरू १०० के्रट, चिक्कू २ हजार गोणी, खरबुजाची १५ ते २० टेम्पो, बोरे २०० ते २५० गोणी, स्ट्रॉबेरी १० ते १२ टन, द्राक्षे २० ते २५ टन इतकी आवक झाली.
--
थंडीमुळे फुलांची आवक घटली
थंडीचा कडाका वाढल्याने त्याचा परिणाम गुलछडी, लिलीच्या उत्पादनावर झाला आहे. मार्केट यार्डातील फुलबाजारात या फुलांची आवक घटली असून त्यांच्या
भावात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात सर्व प्रकारच्या फुलांची साधारण आवक होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मागणी कायम असल्याने दर टिकून आहेत. रोझ डेच्या पार्श्वभूमीवर रंगीबेरंगी डच गुलाबांना चांगली मागणी राहिली. परिणामी, गेल्या आठवड्याच्या तुलनेत डच गुलाबाच्या दरात दुपटीने वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.