चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक कमी होऊनही भावात वाढ झाली. तळेगाव बटाट्याची आवक कमी झाल्याने बाजारभावात घसरण झाली. भुईमूग शेंगांची आवक वाढूनही होऊनही भावात वाढ झाली, लसणाची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. वाटाण्याची प्रचंड आवक झाल्याने बाजारभाव सळले. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा व दोडक्याची आवक कमी होऊनही बाजारभावात घट झाली.पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू भाजीची आवक घटूनही भावात घसरण झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाईंची संख्या घटली तर म्हैस,बैल शेळ्यांमेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल ३ कोटी २० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २२२५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ३७७५ क्विंटलने घटल्याने कांद्याचे भावात ५०० रुपयांची वाढ झाली.तळेगाव बटाट्याची एकूण आवक ७५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ३५० क्विंटलने कमी होऊनही बटाट्याच्या भावात ४०० रुपयांची घसरण झाली. बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवरून १,६०० हजार रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक १० क्विंटल झाली.मागील आठवड्याच्या तुनलेत ५ क्विंटलने कमी होऊनही बाजारभावात ९,००० रुपयांवर स्थिरावले.भुईमूग शेंगांची १५ क्विंटल आवक झाल्याने भाव ७,००० पोहोचले.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक १५८ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३,००० ते ४,००० रुपये असा भाव मिळाला. शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –
कांदा - एकूण आवक - २,२२५ क्विंटल. भाव क्रमांक १. ३,५०० रुपये, भाव क्रमांक २. २,७०० रुपये, भाव क्रमांक ३. २,००० रुपये.
बटाटा - एकूण आवक - ७५० क्विंटल. भाव क्रमांक १. १,६०० रुपये, भाव क्रमांक २. १,४०० रुपये, भाव क्रमांक ३. १,२०० रुपये.
फळभाज्या
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
टोमॅटो - ४३ पेट्या ( ५०० ते ८०० रू. ), कोबी - ७२ पोती ( २०० ते ४०० रू. ), फ्लॉवर - ७४ पोती ( ३०० ते ५०० रू.),वांगी - २० पोती ( २,००० ते ३,००० रू.). भेंडी - १८ पोती ( २,००० ते ३,००० रू.),दोडका - १८ पोती ( २,००० ते ३,००० रू.). कारली - १७ डाग ( २,००० ते ३,००० रू.). दुधीभोपळा - १३ पोती ( १,००० ते १,५०० रू.),काकडी - १६ पोती ( १०० ते १,००० रू.). फरशी ६ - पोती ( १,००० ते २,००० रू.). वालवड - ९ पोती ( २,००० ते ४,००० रू.). गवार - ९ पोती ( २,५०० ते ३,५०० रू.). ढोबळी मिरची - २१ डाग ( १,००० ते २,००० रू.). चवळी - ४ पोती ( १,०००) ते २,००० रू. ), वाटाणा - ५३० पोती ( १,३०० ते १,८०० रू. ), शेवगा - ४ पोती ( ५,००० ते ७,००० रू. ), गाजर - १०७ पोती ( १,२०० ते १,६०० रू).
पालेभाज्या
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची ७० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला ५०१ ते १,५०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबिरीची ९५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना १०१ ते ९५१ रुपये एवढा भाव मिळाला.
चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
मेथी - एकूण २७ हजार ९५० जुड्या ( ५०० ते १,००० रू. ), कोथिंबीर - एकूण ३१ हजार ५२० जुड्या ( ४०० ते ८०० रू. ), शेपू - एकूण ३ हजार ९५० जुड्या (३०० ते ५०० रू. ), पालक - एकूण ४ हजार १२० जुड्या ( २०० ते ५०० रू. ).
जनावरे
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६० जर्शी गाईंपैकी ३० गाईंची विक्री झाली. ( १०,००० ते ४,०००० रू. ), १७० बैलांपैकी ७० बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३,०००० रू. ), १६० म्हशींपैकी १३५ म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६,०००० रू. ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ८४४५ शेळ्या - मेंढ्यापैकी ७८६५ मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,५०० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.
१० चाकण
चाकण बाजारात मेथीचा लिलाव सुरू.