शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायकारक जमीन संपादन रोखू, शेतकऱ्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 01:08 IST

चासकमान कालव्याच्या थेंबभरही पाण्याचा लाभ झाला नाही, तरीही शासनाने पुनर्वसनासाठी जमिनी संपादित करण्याचा घाट घातला आहे, हे अन्यायकारक असून, प्रसंगी रक्त सांडू, पण जमिनींचा ताबा घेऊ देणार नाही, असा निर्धार काळुस (ता. खेड) येथील शेतक-यांनी व्यक्त केला.

काळुस - चासकमान कालव्याच्या थेंबभरही पाण्याचा लाभ झाला नाही, तरीही शासनाने पुनर्वसनासाठी जमिनी संपादित करण्याचा घाट घातला आहे, हे अन्यायकारक असून, प्रसंगी रक्त सांडू, पण जमिनींचा ताबा घेऊ देणार नाही, असा निर्धार काळुस (ता. खेड) येथील शेतक-यांनी व्यक्त केला. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना मानणा-या शेतक-यांनी या प्रश्नावर एकत्र येत येथे झालेल्या ग्रामसभेत वरील निर्धार व्यक्त केला.खेड तालुक्यातील काळुस गावच्या पुनर्वसन जमिनीच्या संपादनाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. चासकमान धरणाचा उजवा कालवा काळुसमधून जातो. वीस वर्षांपूर्वी या कालव्याचे थेंबभरही पाणी गावात आले नाही. कालवा आणि पोटचाºयांसाठी शेतकºयांच्या जमिनी घेण्यात आल्या. गाव लाभक्षेत्रात येत असल्याचे दाखवून सुमारे सहाशे एकर क्षेत्रावर भूसंपादनाचे शिक्के मारण्यात आले. मुळात कालव्याला पाणी आलेच नाही, तर लाभक्षेत्राच्या नियमानुसार चुकीचे व अन्यायकारक भूसंपादन झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. यामुळे जमीन विकसन, खातेफोड कर्ज काढणे आदी अनेक समस्यांना शेतकºयांना तोंड द्यावे लागत आहे.यापूर्वी गावातून रिलायन्स वायूवाहिनी, एच. पी. वायूवाहिनी या प्रकल्पांसाठीही शेतकºयांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. आता नव्यानेच भामा-आसखेड धरण प्रकल्पग्रस्तांसाठीही येथील जमिनी संपादित करण्याचे शासनाचे नियोजन आहे. गावातील शेतकरी याविरोधात एकवटला असून विरोधाची ठाम भूमिका शेतकºयांनी घेतली आहे. याबाबत सविस्तर भूमिका मांडण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.सरपंच यशवंत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वच राजकीय पक्षांच्या पुढारी व शेतकºयांची उपस्थिती होती. माजी पंचायत समिती सदस्य बबन अरगडे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब दौडकर, सुभाष पवळे, माजी सरपंच गणेश पवळे, माजी उपसरपंच केशव अरगडे, मोहन पवळे, विश्वनाथ पोटवडे, विठ्ठल अरगडे, विठाबाई खलाटे, संदीप पोटवडे यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. काहीही झाले तरी जमिनीचा ताबा घेऊ देणार नसल्याची ठाम भूमिका शेतकºयांनी यावेळी व्यक्त केली. मोहन पवळे यांनी आभार मानले.जमीन संपादनाच्या प्रश्नावर सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि शेतकरी सर्व मतभेद विसरून एकत्र आले आहेत. आपल्यातील दुहीचा फायदा शासन घेत आहे. त्यामुळे जे होईल ते मिळून करू, अशी भावना व्यक्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वी प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकºयांचे समाधान झाल्याशिवाय संपादन करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी ३४ एकर जमिनीचे वाटप लाभार्थ्यांना केले आहे, ही दिशाभूल असून याबाबत शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.राजकीय पक्षांकडून आपला फक्त वापर होत असल्याचेही काही शेतकºयांनी बोलून दाखविले. आता आपली लढाई आपणच लढू, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Puneपुणे