पिंपरी : महापालिका निवडणुकीची उमेदवारी यादी जाहीर झाली. त्यामध्ये वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्यांना डावलून आयारामांना संधी दिली. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, त्यांनी काळे झेंडे लावून पक्षाच्या अध्यक्षांचा निषेध नोंदवत शनिवारी पक्ष कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच ‘अध्यक्ष हटाव, भाजपा बचाव’ असा नारा दिला. उमेदवारी देताना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व अन्य पक्षांतून भाजपात आलेल्यांना प्राधान्य दिले गेले. त्यामुळे सरचिटणीस राजु दुर्गे व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. प्राधिकरणात पक्ष कार्यालयामोर सरचिटणीस अमोल थोरात यांनी काळे झेंडे लावून निषेध नोंदवला. (प्रतिनिधी)
अध्यक्ष हटाव; भाजपा बचाव
By admin | Updated: February 5, 2017 03:28 IST