शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

स्वबळावर लढण्याची तयारी

By admin | Updated: October 6, 2016 03:19 IST

मावळ तालुका पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी टाकवे, वडेश्वर, सोमाटणे गण सर्वसाधारण जागेसाठी खुले राहिले आहेत. चांदखेडआणि कुसगाव गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित

वडगाव मावळ : मावळ तालुका पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी टाकवे, वडेश्वर, सोमाटणे गण सर्वसाधारण जागेसाठी खुले राहिले आहेत. चांदखेडआणि कुसगाव गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी राजकीय पक्षांनी केली आहे. गण आरक्षण सोडत येथील महसूल भवन सभागृहांमध्ये झाली. दहा पंचायत समिती मतदारसंघातून महिलांना पन्नास टक्के आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर उर्वरित अन्य गणांची आरक्षणे जाहीर करण्यात आली. मतदारसंघ आरक्षण सोडतप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रांताधिकारी सुनील थोरवे व तहसीलदार योगेंद्र कट्यारे, नायब तहसीलदार सुनंदा भोसले, सतीश धस यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. तालुक्यातील टाकवे, वडेश्वर, इंदोरी, सोमाटणे, वडगाव, खडकाळा, कुसगाव, वाकसई , महागाव आणि चांदखेड हे मतदारसंघ असून, आगामी पंचायत समिती निवडणुकींतील उमेदवारांचे आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात आले.टाकवे, वडेश्वर, सोमाटणे गण सर्वसाधारण जागेसाठी खुले राहिले आहेत. कुसगाव आणि चांदखेड गणात सर्वसाधारण महिलांना निवडणूक लढविता येणार आहे. इंदोरी गण अनुसूचित जाती महिला, वडगाव गण इतर मागासवर्ग सर्वसाधारण , खडकाळा व महागाव गण इतर मागासवर्ग महिला, वाकसई गण अनुसूचित जमाती सर्वसाधारण अशी सोडत जाहीर करण्यात आली. (वार्ताहर) इच्छुकांनी काढले कुणबीचे दाखलेभाजपा आणि आगामी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे उमेदवारही रिंगणात असल्याने व निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्यामुळे मतदारसंघातील वर्चस्वाचा अंदाज लावणे अश्यक्य आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीत मावळात नवीन राजकीय समीकरणे तयार होऊ शकतात. सर्वसाधारणसाठी जागा खुली न राहिल्यास खबरदारी म्हणून काही इच्छुक उमेदवारांनी ओबीसीचे दाखले काढून ठेवले आहेत.