शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

‘पुरुषोत्तम’साठी महाविद्यालयांची तयारी पूर्ण; १५, १६, १७ डिसेंबरला पुण्यात रंगणार स्पर्धा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 11:56 IST

पुरुषोत्तम महाकरंडकासाठी पुण्यासह इतर विभागातील महाविद्यालयांची तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धा १५, १६, १७ डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार आहे.

ठळक मुद्देसकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार भरत नाट्य मंदिर येथे एकांकिका स्पर्धा अभिनेते विद्याधर जोशी, दिग्दर्शक अश्विनी गिरी, अभिनेते बाळकृष्ण दामले करणार परीक्षण

पुणे : अभिनय या क्षेत्रात सुरुवातीचा मार्ग दाखवणारा आणि तरुण पिढीला एक नवीन वाटचाल मिळवून देणारा अभिनय या क्षेत्राचे उल्लेखनीय कला मंच म्हणजेच पुरुषोत्तम करंडक होय. या पुरुषोत्तम महाकरंडकासाठी पुण्यासह इतर विभागातील महाविद्यालयांची तयारी पूर्ण झाली आहे. पुरुषोत्तम महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा १५, १६, १७ डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार आहे. या महाअंतिम फेरीचे परीक्षण नाट्यअभिनेते विद्याधर जोशी, दिग्दर्शक अश्विनी गिरी, अभिनेते बाळकृष्ण दामले करणार आहेत. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची आॅगस्टमध्ये पुणे विभागातून सुरुवात झाली. त्यानंतर कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, नागपूर या विभागांत ही स्पर्धा घेतली. प्रत्येक विभागातून सांघिक पारितोषिके काढली. त्यामध्ये पुणे विभागातून तीन सांघिक पारितोषिके, रत्नागिरी विभागातून चार, जळगाव विभागातून चार व नागपूर विभागातून तीन असे एकूण अठरा महाविद्यालयांची निवड महाकरंडकासाठी करण्यात आली. 

आमची तालीम नियमितपणे सुरू आहे. सध्या बेसिक गोष्टींचा सराव करत आहोत. गेली दोन वर्षे पुण्यात महाकरंडक मिळत नाही. त्यासाठी यंदाच्या वर्षी हा मान मिळवण्याचा प्रयत्न  करू.  - ऋषी मनोहर, विद्यार्थी दिग्दर्शक, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे

परीक्षा असल्याने तालीम थोडी थांबवली होती. पण गेल्या दोन दिवसांत तालमीला जोरदार सुरुवात करून नाटकात काही बदल केलेला नाही. आम्ही गेली दोन दिवस तालमीला सहा तास अतिशय प्रामाणिकपणे सराव केल्याने करंडक जिंकण्यासाठी एक विश्वास निर्माण झाला आहे.-सिद्धांत पाटील, विद्यार्थी दिग्दर्शक, मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे

पुण्यात पुरुषोत्तम करंडक जिंकल्यावर आत्मविश्वासात भर पडली आहे. त्या अनुषंगाने महाकरंडकावरसुद्धा नाव कोरण्याचे ध्येय ठेवले आहे. एकांकिकेत बऱ्याच सुधारणा केल्या आहेत.-कृष्णा वाळके, विद्यार्थी दिग्दर्शक, न्यू आर्ट्स, सायन्स, कॉमर्स महाविद्यालय, अहमदनगर-पुणे

पुरुषोत्तम महाकरंडक जिंकणे म्हणजे या स्पर्धेत एक वेगळेच स्थान निर्माण करण्यासारखे आहे. आमची जोमाने तयारी पूर्ण झाली आहे. पुन्हा तोच जोश घेऊन आम्ही रंगमंचावर उतरणार आहोत.- भूमिका पाटील, विद्यार्थी दिग्दर्शक, प्रताप महाविद्यालय, जळगाव

आमची ही पहिली वेळ आहे. पुरुषोत्तम महाकरंडकसाठी आमची निवड झाली याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आमच्या टीममध्ये एकूण दहा कलाकार असून रंगमंचावर दोनच कलाकार नाटक सादर करतात व बाकी सर्व नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत यामध्ये आहेत. आमचे दोन कलाकार उत्तम अभिनय दाखवून करंडक मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. - ओंकार देव, विद्यार्थी दिग्दर्शक, संताजी महाविद्यालय, नागपूर 

टॅग्स :Puneपुणे