शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती-प्रसूत महिलांचे पाण्याविना हाल; कमला नेहरु रुग्णालयातील संतापजनक परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 20:02 IST

स्वच्छता गृहांना कुलूप, अन्य वॉर्डातून लावले जाते हाकलवून

पुणे : प्रसुतीसाठी दाखल झालेल्या गरोदर महिलांना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या असंवेदनशील कारभारामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात स्वच्छतागृहांमध्ये मागील काही दिवसांपासून पाणीच येत नसल्याने या महिलांची कुचंबना होत आहे. दुसऱ्या वॉर्डातील स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी गेले तर या महिलांना नर्स आणि डॉक्टर हाकलवून लावत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पालिकेचे कमला नेहरु रुग्णालय गोरगरीबांसाठी आधार आहे. या रुग्णालयातील व्यवस्था सुधारण्यासाठी अनेकदा लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मागणी केलेली आहे. परंतु, आरोग्य विभागाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या आठवड्याभरापासून कमला नेहरु रुग्णालयातील रुग्णांना पाणीच मिळत नसल्याचे समोर आले आहे. वारंवार तक्रारी करुनही रुग्णालय प्रशासन याची साधी दखलही घेत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत.

याठिकाणी प्रसुतीकरिता दाखल झालेल्या एका महिलेच्या बहिणीने याबाबत ‘लोकमत’कडे कैफियत मांडली. या महिलेची बहिण प्रसुतीसाठी दाखल झाल्यानंतर तिचे सिझेरियन झाले. दोन-तीन दिवसांची ही ओली बाळंतिण स्वच्छतागृहात गेली असता तेथे पाणी नव्हते. त्यामुळे ती १० नंबर वॉर्डमध्ये गेली. परंतु, तेथे कुलूप लावण्यात आलेले होते. दुसऱ्या एका वॉर्डमध्ये गेल्यावर तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या महिलेला हाकलवून लावले.  ‘तुमच्या वॉर्डात स्वच्छतागृह आहे, त्याचाच वापर करा. अन्य वॉर्डात येऊ नका.’ असे म्हणत परत पाठवून दिले. या महिलेला चौथ्या मजल्यावरच्या स्वच्छतागृहापर्यंत चढून जावे लागले.

असाच अनुभव नुकत्याच दाखल झालेल्या आणखी एका गरोदर महिलेला आला आहे. ही महिला अद्याप प्रसुत झालेली नसली तरी तिचे दिवस भरलेले आहेत. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते. परंतु, या अवघडलेल्या अवस्थेतील महिलांना पालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकारी मात्र असंवेदनशीलपणाची वागणूक देत आहेत. 

महिलांसह अन्य रुग्णांना स्वच्छतागृहासह अंघोळीसाठी पाणी मिळत नसल्याने नातेवाईक आरडाओरडा करीत आहेत. परंतु, त्यांच्या उद्विगनतेकडेही दुर्लक्ष केले जात आहे. याठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे सुरु असल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी येत असल्याचे कारण देण्यात येते आहे. तक्रार करण्यास गेले तर ‘कोणाकडे तक्रार करायची ती करा’ असेही सुनावले जात आहे

टॅग्स :Puneपुणेpregnant womanगर्भवती महिलाhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका