पुणो : चांगल्या पगाराची नोकरी मिळत नसल्यामुळे केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच प्रवेश घेणारे विद्यार्थी आता पारंपरिक अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेत असल्याचे आश्वासक चित्र दिसून येत आहे. पुण्यात पारंपरिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी येणा:या विद्याथ्र्याचा टक्क दरवर्षी वाढत चालला आहे. परंतु, शिक्षणशास्त्र (बीएड) अभ्यासक्रमास प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याची संख्या घटत चालली आहे.
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याची संख्या काही वर्षापूर्वी घटत चालली असल्याचे दिसून येते होते. परंतु, शासकीय कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या आधारे पुण्यात पारंपरिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास येणा:या विद्यार्थाच्या संख्येत गेल्या पाच वर्षापासून सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी विद्यार्थी व्यवसाय अभ्यासक्रमालाच पसंती देत नाहीत तर पारंपरिक अभ्यासक्रमाकडेही वळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्यात पदवीचे शिक्षण घेणा:यासाठी राज्यातील विविध ठिकाणचे विद्यार्थी येत असतात. या विद्याथ्र्याची आकडेवारी विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने महाविद्यालयांकडून जमा केली आहे. त्यानुसार पुण्यात प्रथम वर्षाचे शिक्षण घेण्यासाठी येणा:या विद्याथ्र्याच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. 2011-12 या शैक्षणिक वर्षात कला शाखेत 97 हजार 955 विद्याथ्र्यानी प्रवेश घेतला तर 2012-13 या शैक्षणिक वर्षात 1 लाख 56 विद्याथ्र्यानी प्रवेश घेतला. परंतु, बीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याची संख्या गेल्या दोन वर्षात दोन हजाराने कमी झाली आहे. देशाच्या विकासासाठी विविध क्षेत्रंत संशोधन होणो आवश्यक आहे. परंतु संशोधनासाठी पायाभूत शिक्षण गरजेचे असते. त्याचप्रमाणो विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील काही विषयांचा अभ्यासक्र उपयुक्त ठरतो. त्यामुळे केवळ अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्चर आदी अभ्यासक्रमांना प्रवेश न घेता नामांकित महाविद्यालयांत पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याची संख्या वाढत आहे. इयत्ता बारावीचा निकालाचा टक्का वाढल्यामुळेही पारंपरिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणा:यांची संख्या वाढत चालली असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.(प्रतिनिधी)