शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व पुरंदरमध्ये बेसुमार वाळूउपसा

By admin | Updated: December 26, 2014 23:18 IST

पूर्व पुरंदरमधील कऱ्हा नदीपात्राबरोबरच लहान-मोठ्या पाझर तलावातून रात्रंदिवस वाळूउपसा होत असून, महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत आहे

जेजुरी : पूर्व पुरंदरमधील कऱ्हा नदीपात्राबरोबरच लहान-मोठ्या पाझर तलावातून रात्रंदिवस वाळूउपसा होत असून, महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. वारंवार तहसील कार्यालयाकडे तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.आज या परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली असता, नदीपात्रात दिवसाढवळ्या वाळूउपसा जेसीबीच्या साह्याने होत होता. वाहतुकीसाठीची वाहने शेजारीच उभी होती. तर एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा केलेले ढीग होते. अशा प्रकारे दिवसाढवळ्या वाळूउपसा होत असूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने परिसरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शेवगाई पाझर तलावातील वाळूउपसा करणारा एक जेसीबी गेल्या पाच दिवसांपासून जेजुरी पोलीस ठाण्यात महसूल विभागाकडून ताब्यात घेऊन लावण्यात आलेला असून, अजूनही त्याच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. या संदर्भात पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, या संदर्भात आम्ही त्वरित कारवाई करीत असल्याचे सांगितले. दरम्यान, जेजुरीचे मंडलाधिकारी संजय बडदे यांनी या परिसरात महसूल कर्मचाऱ्यांसह छापा टाकून मोठ्या प्रमाणावर वाळूसाठ्याच्या ढिगांचे पंचनामे केले आहेत, तर वाळूउपसा करणाऱ्या वाहनांची जप्ती केली असल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळू उपशामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. याबरोबरच नदीचे पात्र बदलण्याचा धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)