शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

‘जीपीएस’ ठरविणार प्री-पेड रिक्षाचे भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:30 IST

बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांची रिक्षाचालकांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी पुन्हा प्री-प्रेड रिक्षासेवेला संजीवनी मिळणार आहे.

- राजानंद मोरे पुणे : बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांची रिक्षाचालकांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी पुन्हा प्री-प्रेड रिक्षासेवेला संजीवनी मिळणार आहे. या रिक्षांचे भाडे ठरविण्यासाठी पहिल्यांदाच ‘जीपीएस’ यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. या यंत्रणेद्वारे प्रवाशाच्या जाण्याच्या ठिकाणापर्यंतचे अंतर मोजून त्यानुसार भाडे आकारले जाईल. याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) वजन मापे विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून त्यानंतर अंमलबजावणी सुरू होईल.शहरात एसटी, खासगी बस, रेल्वे, विमानाने शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील अनेक इच्छित ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाला प्राधान्य देतात. पण अनेकदा काही रिक्षाचालक संबंधित प्रवाशांकडून जादा भाडे घेतात. मीटर सुरू न करता थेट एक रक्कम भाडे म्हणून सांगितली जाते. रात्रीच्या वेळी तर असे प्रकार सर्रासपणे होतात. पण प्रवाशांना इतर पर्याय उपलब्ध नसल्याने नाईलाजाने जादा पैसे दिले जातात. या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी शहरात स्वारगेट, शिवाजीनगर, रेल्वे स्टेशन, लोहगाव विमानतळ या ठिकाणी प्री-पेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. पण कालांतराने ही सेवा बंद पडली. सध्या केवळ विमानतळ परिसरातच ही सेवा सुरू आहे. ही सेवा जुन्याच पद्धतीने सुरू असून अंतरानुसार आधीच भाडे निश्चित केलेले आहे.आता पुन्हा एकदा प्री-पेड रिक्षा सेवेला नवसंजीवनी मिळणार आहे. ‘आरटीओ’कडून ही सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि संगमवाडी येथे प्री-पेड रिक्षा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, नव्याने ही सेवा सुरू करताना त्यासाठी ‘जीपीएस’ यंत्रणेचा आधार घेतला जाणार आहे. प्रवासी प्री-पेड बुथवर आल्यानंतर त्यांना इच्छित स्थळ सांगावे लागेल. बुथवरील प्रतिनिधीकडून ‘जीपीएस’च्या माध्यमातून ते ठिकाण शोधले जाईल. ही यंत्रणा बुथ आणि इच्छित ठिकाणापर्यंतचा सर्वाधिक जवळचा रस्ता दाखवेल. त्यानुसार प्रवाशांना भाडे आकारले जाईल. या भाड्यावर पूर्वीप्रमाणेच सेवेसाठीचे २५ टक्के जादा पैसे आकारले जाणार आहे.>प्रस्ताव आरटीओकडे‘जीपीएस’ यंत्रणेद्वारे प्री-पेडचा मार्ग व भाडे निश्चित करण्याची यंत्रणा अद्याप महाराष्ट्रात कुठेही वापरली जात नाही. पुण्यात पहिल्यांदाच या यंत्रणेचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ‘जीपीएस’द्वारे भाडे ठरविण्याची ही पद्धत योग्य आहे किंवा नाही याबाबत वजन मापे विभागाकडून मार्गदर्शन घेतले जाणार आहे.त्याबाबतचा प्रस्ताव आरटीओकडून विभागाला पाठविण्यात आला आहे. विभागाकडून त्याची व्यावहारिकता तपासून प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतरच प्री-पेडसाठी जीपीएसचा वापर करण्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.