शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

वालचंदनगर-कळस गटात प्रतापराव पाटील विजयी

By admin | Updated: January 31, 2015 00:28 IST

वालचंदनगर-कळस जिल्हा परिषद गटाच्या पोट निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रदीप पाटील

इंदापूर : वालचंदनगर-कळस जिल्हा परिषद गटाच्या पोट निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रदीप पाटील यांचा धुव्वा उडवत त्यांच्यावर ७ हजार २७० मतांच्या फरकाने विजय मिळविला.भाजपाचे उमेदवार युवराज म्हस्के यांच्यासह सहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. निवडणुकीत उभ्या असणाऱ्या सर्व उमेदवारांची आकडेवारी पाहता त्या सर्वांपेक्षा तब्बल ४ हजार ४३९ मते जादा घेत प्रतापराव पाटील यांनी हा विजय संपादित केला आहे. प्रतापराव पाटील यांना १२ हजार ७२२ मते मिळाली. प्रदीप पाटील यांनी ५ हजार ४५२ मते मिळाली. तर युवराज म्हस्के यांना १ हजार ६७८ मते मिळाली. प्रतापराव पाटील यांच्या विरोधकांच्या एकूण मतांची आकडेवारी ८ हजार २८३ आहे.आमदार दत्तात्रय भरणे यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर वालचंदनगर- कळस जिल्हा परिषदेची जागा रिक्त झाली होती. त्या जागेची ही पोटनिवडणूक खरे तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीत भाजपामध्ये ऐनवेळी प्रवेश केलेले युवराज म्हस्के यांना केवळ १६७८ मते मिळाली. शिवसेनेचे मंदार डोंबाळे यांना ३१५, राष्ट्रीय समाज पक्षाचे दिलीप धायगुडे यांना ५०३ मतांवर समाधान मानावे लागले. एकूणच या निवडणुकीवर आमदार दत्तात्रय भरणे यांचा प्रभाव दिसून आला. (वार्ताहर)