शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
2
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
3
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
4
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
6
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
7
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
8
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
9
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
12
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
13
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
14
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
15
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
16
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
17
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
18
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
19
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
20
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

‘संस्कार’चा प्रकाश आदिवासींच्या घरोघरी

By admin | Updated: November 14, 2015 03:05 IST

दिवाळी म्हटले की, आनंद, रोषणाई, अन् फटाकेबाजी आलीच... पण, प्रत्येकाच्याच घरात ही रोषणाई असतेच, असे नाही. ज्या भागात वीज, रस्ता यांची व्यवस्था नाही,

पिंपरी : दिवाळी म्हटले की, आनंद, रोषणाई, अन् फटाकेबाजी आलीच... पण, प्रत्येकाच्याच घरात ही रोषणाई असतेच, असे नाही. ज्या भागात वीज, रस्ता यांची व्यवस्था नाही, अशा आदिवासी विभागातील लोकांच्या घरोघरी आकाशकंदील लावून त्यांची दिवाळी झगमगावी, यासाठी संस्कार प्रतिष्ठानने प्रयत्न केले. शहरात तर रोजच दिव्यांची रोषणाई असते; परंतु आदिवासी विभागात तीन तासही अखंडित वीजपुरवठा नसतो. याकरिता यंदाची दिवाळी वेल्हा तालुक्यातील चांदर आदिवासी पाडा विभागातील आदिवासींसोबत साजरी करण्याचा निश्चय प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केला. केवळ निश्चय करून न थांबता उपक्रम राबविण्याची संपूर्ण तयारी केली. पिंपरी-चिंचवडमधील शाळा-कॉलेजमध्ये जाऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून, फटाक्यांवर होणारा खर्च गरजूंवर खर्च करावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केले. यासाठी जनजागृती फेरी काढली. शाळा- कॉलेजच्या वर्गणीमधून जमा झालेल्या रकमेतून दिवाळीच्या पहिल्या दिवशी (९ नोव्हेंबरला) आदिवासी विभागातील ५० कुटुंबाच्या दारी आकाशकंदील लावले. स्त्रियांसाठी १०० साड्या, मुला-मुलींसाठी १०० ड्रेस आणि लहान मुलांना कपडे दिले. प्रत्येकाला फराळ आणि मिठाईचे वाटप केले.सांगवीतील टाटा मोटर्स समाज केंद्राने वस्त्रदान उपक्रमाच्या माध्यमातून जमा झालेले कपडे प्रतिष्ठानला मिळाले होते. शिवाय हा उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेने सहकार्य केले. आकाशकंदील, मिठाई यासाठी रेणुका मिरपगार, तुषार कोंडे, दिगंबर गुंजाळ, दीपाली मोरे, पल्लवी चव्हाण, भाऊसाहेब मातणे आदींनी सहकार्य केले. डॉ. मोहन गायकवाड व सोमनाथ पतंगे यांनी उपक्रमांचे संयोजन केले.