शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रल्हाद सावंत हे क्रीडा क्षेत्रातील प्राध्यापक होते, क्रीडा, शिक्षण, राजकारणातील अनेक मान्यवरांची श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 02:21 IST

प्रल्हाद सावंत हे क्रीडा क्षेत्रातील निष्णात प्राध्यापक होते. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे

पुणे : प्रल्हाद सावंत हे क्रीडा क्षेत्रातील निष्णात प्राध्यापक होते. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच माजी सचिव आणि ज्येठ क्रीडा संघटक प्रल्हाद सावंत यांना रविवारी श्रद्धांजली अर्पण केली.सावंत यांचे गुरूवारी (दि. ९) निधन झाले. रविवारी संध्याकाळी मॅरेथॉन भवन येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सभेतअ‍ॅथलेटिक्सचे भीष्म पितामह... मॅरेथॉनचा महामेरू... ज्येष्ठ क्रीडा पत्रकार... उत्कृष्ट क्रीडा संघटक... आणि अष्टपैलू व्यक्तीमत्व अशा शब्दांत सावंत यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या वेळी बाबुराव सणस मैदानाच्या पॅव्हेलियनला क्रीडाक्षेत्रासाठी आयुष्य वाहिलेल्या प्रल्हाद सावंत यांचे नाव देण्यासाठी महापालिकेत ठराव करू, आणि ते काम मार्गी लावू अशी घोषणा भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी केली.या सभेला यावेळी क्रीडा, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. माजी आमदार उल्हास पवार, दिप्ती चवधरी, महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, अ‍ॅड. नरेंद्र निकम, अ‍ॅड. विजय सावंत, राजेंद्र कुंजीर, माजी उपमहापौर सतीश देसाई, डॉ. मधुसुदन झंवर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पराग संचेती, राज्याचे क्रीडा उपसंचालक नरेंद्र सोपल, शोभा निकम, आबा तुपे, अविनाश बागवे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उद्योजक भारत देसडला, सुमंत वाईकर, भारतकुमार व्हावळ, गुरबन्स कौर, आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू रोहन मोरे आदींची भाषणे झाली. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या