शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील वीजपुरवठा अनेक ठिकाणी विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 03:55 IST

महापारेषण मनोऱ्याच्या (टॉवर लाईन) वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याच्या नियोजित कामामुळे २२० केव्ही क्षमतेच्या दोन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. ५) सकाळी ७ वाजता बंद ठेवण्यात आला होता.

पुणे - महापारेषण मनोऱ्याच्या (टॉवर लाईन) वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याच्या नियोजित कामामुळे २२० केव्ही क्षमतेच्या दोन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. ५) सकाळी ७ वाजता बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे पर्वती, पद्मावती, रास्तापेठ, कोथरूड, धनकवडी, सिंहगड रस्ता, पुणे स्थानक, दत्तवाडी परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता; मात्र दुपारी दीड ते ४ वाजे दरम्यान या भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.देहूरोड-कात्रज बायपास राष्ट्रीय महामार्गावरील मनोºयाच्या (टॉवर लाईन) वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याचे काम महापारेषण कंपनीकडून गुरुवारी (दि. ५) सकाळी ७ वाजता सुरू करण्यात आले. त्यासाठी २२० केव्ही पर्वती-नांदेड सिटी व २२० केव्ही पर्वती-फुरसुंगी या दोन वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे महापारेषणच्या पर्वती उपकेंद्र्र, तसेच विविध २२ केव्ही उपकेंद्रांचाही वीजपुरवठा बंद झाला. यात रास्तापेठ, कसबा पेठ, घोरपडी, मंडई, भवानी पेठ, मुकुंदनगर, शंकरशेठ रोड, महर्षीनगर, सॅलीसबरी पार्क, वडगाव बुद्रुक, हिंगणे, विकासनगर, सिंहगड रोड, गुलटेकडी, सहकारनगर, मित्रमंडळ चौक, सुभाषनगर, पर्वती गाव, विठ्ठलवाडी, दत्तवाडी, शारदा मठ, मार्केटयार्ड, कोंढवा, कात्रज आदी परिसरातील वीजपुरवठा सकाळी ७ ते दुपारपर्यंत देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी बंद होता.महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांच्यासह सुमारे ७० अभियंते व कर्मचारी वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याच्या कामात सहभागी झाले होते. सुमारे ६ मीटर उंचीवर असलेल्या या दोन्ही २२० केव्ही वीजवाहिन्या सुमारे १२ मीटर उंचीवर नेण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी जवळच एक स्वतंत्र मनोरा उभारण्यात आला. त्यानंतर पर्वती-फुरसुंगी वाहिनीचे काम दुपारी सव्वा एकच्या सुमारास पूर्ण झाले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या