शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जेतून कृषि पंपांना वीज : चंद्रशेखर बावनकुळे; वारजेत सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 12:39 IST

येत्या तीन वर्षात राज्यातील ९० टक्के शेती पंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसा देखील वीजपुरवठा होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ठळक मुद्देवारजे येथील आदित्य गार्डन सिटी सोसायटीमध्ये दीडशे किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटनराज्य शासनाने सौर ऊर्जेवरील कृषी वाहिन्यांच्या प्रकल्पाला चालना दिली : बावनकुळे

पुणे : येत्या तीन वर्षात राज्यातील ९० टक्के शेती पंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसा देखील वीजपुरवठा होणार असून, वीजपुरवठ्याचा प्रतियुनिट दर देखील निम्म्यावर येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि.२१) येथे दिली.वारजे येथील आदित्य गार्डन सिटी सोसायटीमध्ये दीडशे किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. आमदार भीमराव तापकिर, महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने, एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका दिपाली धुमाळ, नगरसेविका सायली वांजळे, सोसायटीच्या अध्यक्ष साक्षी महाले या वेळी उपस्थित होते.ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, की पूर्वी सौरऊर्जेवरील वीजनिर्मितीसाठी प्रतियुनिट १६ रुपये खर्च येत होता. केंद्र व राज्य सरकारने सौरऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिल्याने हा खर्च प्रतियुनिट तीन ते साडेतीन रुपयांवर खाली आला आहे. शहरी व ग्रामीण भागात सौरऊर्जेवरील प्रकल्पात वाढ होत आहे. या सोबतच राज्यातील सुमारे ४५ लाख शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने सौर ऊर्जेवरील कृषी वाहिन्यांच्या प्रकल्पाला चालना दिली आहे. या महत्वाकांक्षी सौर प्रकल्पाद्वारे येत्या तीन वर्षांत राज्यातील ९० टक्के शेतीपंपांना वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे. विवेक रत्नपारखी यांनी प्रास्ताविक केले. सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. तर, नगरसेवक सचिन दोडके यांनी आभार मानले.

अडीच हजार मेगावॉट विजेची मागणी कमी होईलपारंपरिक वीजनिर्मितीद्वारे शेतीपंपांना वीजपुरवठ्यासाठी येणारा प्रतियुनिट सहा रुपये खर्चही तीन रुपयांवर येणार आहे. याशिवाय कोळशावरील सुमारे अडीच हजार मेगावॉट विजेची मागणी कमी होईल व त्याचा पर्यावरणाला फायदा होणार असल्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेmahavitaranमहावितरणWarje Malwadiवारजे माळवाडी