शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बारामती: कृषीपंपाचा विजपुरवठा तोडला, आता बळीराजाच्या घरातही अंधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 13:09 IST

कृषीपंपाची वीज तोडूनसुद्धा शेतकरी वीज बील भरण्यास येत नाही हे पाहून वालचंदनगर उपविभागामध्ये थेट शेतकऱ्यांच्या घरातील वीज बंद करण्यात आली आहे...

रविकिरण सासवडे

बारामती: बारामती परिमंडलामध्ये कृषीपंपाची वीज तोडल्यानंतर आता महाविरणने थेट शेतकऱ्यांच्या घरातच अंधार केला आहे. कृषीपंपाची वीज तोडूनसुद्धा शेतकरी वीज बील भरण्यास येत नाही हे पाहून वालचंदनगर उपविभागामध्ये थेट शेतकऱ्यांच्या घरातील वीज बंद करण्यात आली आहे. महावितरणच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

सध्या बारामती परिमंडळाच्या वतीने वीज बिल थकबाकीपोटी शेतपंपाची वीज तोडली आहे. यावर शेतकरी संघटना आक्रमक झाली असून रजिस्टर कंज्यूमर पर्सनल लेजरची मागणी शेतकऱ्यांनी करावी, तसेच न्यायालयाकडून कायदेशीर नोटीस १५ दिवस अगोदर मिळत नाही तोपर्यंत महावितरणला शेतकऱ्यांची वीज तोडता येत नाही, असेही शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. सरकार म्हणजेच कृषी मूल्य आयोग शेतीमालाच्या उत्पादन खर्चाच्या निविष्ठा मांडल्या जातात. या निविष्ठांच्या आधारे कोणत्याही पिकाची किमान आधारभूत किंमत धरली जाते. मात्र या निविष्ठांमध्ये वीज बिल धरले जात नाही. त्यामुळे शेतीमालाच्या आधारभूत किंमती कमी काढल्या जात आहेत.

महाराष्ट्र शासनाने २७ मे २००५ रोजी शेतकऱ्यांना सवलतीच्या वीज दर लागू केला होता. यानंतर ११ ऑक्टोंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार महावितरण कंपनीला शासनाकडून प्रतियुनिट किंवा प्रति अश्वशक्ती सध्या जे विशिष्ट निश्चित रक्कमेइतके अनुदान देण्यात येते. त्या मर्यादेपर्यंत अनुदान यापुढेही सुरू राहील असा निर्णय घेण्यात आला. महावितरणचे मुख्य अभियंता यांना शेतकरी संघटनेच्या वतीने खोटी बिले व खोटी थकबाकी दाखवून शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. या आशयाचा पत्रव्यवहार झाला होता. पाच एचपीपेक्षा जास्त पंपासाठी कंपनीने बारा महिने चोवीस तास (अखंड) वीज पुरवठा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार वीज नियमक आयोगाने ठरवून दिलेल्या २ हजार ८२० रुपये प्रति अश्वशक्ती वीज बिलापोटी प्रति वर्षी शेतकऱ्यांनी ९०० रुपये भरावयाचे आहेत. उर्वरित १ हजार ९२० रुपये अनुदान महावितरणला राज्य सरकारने आगाऊ जमा केले आहे. परंतु, कंपनीने फक्त आठ तासच वीजपुरवठा केला आहे.

९४० ची वीज वापरून रुपये १ हजार ९२० शासनाकडून आगाऊ जमा करून घेतले आहेत. म्हणजेच सरकारच्या वतीने दिली जाणारी रक्कम जादा आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र कृषक हितवर्धक संघटना विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर अशी याचिका दाखल करण्यात आलेली होती. उच्च न्यायालयामध्ये महावितरणने  ०७ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रतिज्ञापत्र सादर करून सदर प्रतिज्ञापत्रातील पेरा क्रमांक १३ मध्ये सध्याचा प्रतिवादी अनुदानाच्या रकमेत कृषी ग्राहकांचा पुरवठा खंडित करत नाही, असे महाराष्ट्र सरकार कडून उत्तर दिले होते, अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांनी दिली.सध्या प्रति अश्वशक्ती २ हजार ८२० रुपये वीज दर आहे. प्रतिवर्षी ३ एचपी शेतीपंपाचे ८ हजार ४६० रुपये बील होते. तर तीन वषार्चे हे वीज बिल २५ हजार ३८० होते. महावितरणला शासनाकडून मिळणाºया ५० हजार ७६० अनुदान रक्कमेतून २५ हजार ३८० रुपये वजा केले तर महावितरण राज्य शासनाकडून २५ हजार ३६० रुपये जादा रक्कम घेत आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेने दिली.शेतकरी कोणत्याही प्रकारे वीज वितरण कंपन्याचे देणे लागत नाही. रजिस्टर कंजुमर पर्सनल लेजरच्या उताऱ्यावरून आम्ही मुंबई उच्च न्यायालयाला देखील ही बाब दाखवून दिली. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने देखील कोणाही शेतकऱ्यांचे वीज जोड तोडू नका. तोडायचा असेल तर १५ दिवस आधी त्याला नोटीस द्या, असा आदेश दिला आहे. या आदेशान्वये आम्ही वसुलीला येणाऱ्याला जाब विचरत आहोत. न्यायालयाचे आदेश घेतल्याशिवाय वसुलीसाठी येऊ नये. न्यायालय यामध्ये बेकायदेशीर आदेश देत नाही. तसेच महाविकास आघाडी सरकार देखील वीज वितरण कंपन्यांना वीज बिलापोटी अनुदान देत आहे.- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष शेतकरी संघटना नियामानुसार डीजिटल पद्धतीने महावितरणने मोबाईल मेसेजद्वारे शेतकºयांना थकित वीजबिलापोटी नोटीस दिली आहे. तसेच थकबाकी भरण्यासाठी महावितरणने वेळोवेळी गावागावात मेळावे घेतले आहेत. त्यामुळे वीजबील भरले पाहिजे.- सुनिल पावडे मुख्य अभियंता, बारामती परिमंडलवास्तविक पाहता मागील पाच ते सहा वर्षांपासून महावितरणने शेतकऱ्यांना बील पाठवलं नाही. हा शेतकऱ्यांचा दोष आहे का? आता पाठवलेल्या बीलामध्ये किती व्याज धरले, किती दंड धरला या गोष्टी स्पष्ट नाहीत. मुळात महावितरणला बीलावर व्याज आकारण्याचा अधिकारच नाही. शेतकऱ्यांनी एकजुटीने याचा विरोध करायला हवा.- अ‍ॅड. श्रीकांत करे जिल्हाध्यक्ष, शेतकरी सुकाणू समिती पुणे

टॅग्स :mahavitaranमहावितरणPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडelectricityवीज