शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बटाट्याची झाली माती!, अतिपावसाने सडला : उर्वरित मालालाही भाव नाही; उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 04:45 IST

बटाटा उत्पादक शेतक-यांची यंदाची दिवाळी कडू होणार आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने बटाटा शेतातच सडला, तर ऐरणीत ठेवलेल्या मालाचेही नुकसान झाले

पेठ : बटाटा उत्पादक शेतक-यांची यंदाची दिवाळी कडू होणार आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने बटाटा शेतातच सडला, तर ऐरणीत ठेवलेल्या मालाचेही नुकसान झाले; तसेच आता राहिलेल्या मालालाही चांगला भाव नसल्यामुळे उत्पादक चिंतेत आहे. आंबेगाव तालुक्यातील बटाटा पिकाचे आगार समजल्या जाणा-या सातगाव पठार भागातील शेतकºयांना याचा मोठा फटका बसला आहे.पेठ, कुरवंडी, कारेगाव, थुगाव, भावडी, कोल्हारवाडी व पारगाव तर्फे खेड परिसरात झालेला पाऊस बटाटा पिकाला मारक ठरला आहे. ४० ते ५० टक्के पीक सडले आहे. उर्वरित शिल्लक असलेल्या बटाट्याला अपेक्षित बाजारभाव नाही. त्यामुळे या भागातील सुमारे १ हजार ५०० शेतकºयांचे ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळ निघाले आहे.या वर्षी जून महिन्यात बटाटा लागवडीसाठी शेतकºयांनी शेत मशागतीची कामे पूर्ण केली होती. वेळेवर पाऊस सुरू झाल्यामुळे दुसºया आठवड्यापासून या भागात बटाटा लागवडीची लगबग सुरू आहे. विशेष म्हणजे, या भागातील शेतीसाठी जलसिंचनाची कोणतीही सोय नाही. पडणा-या पावसावरच येथील शेती व बटाटा पीक अवलंबून आहे. पाच पोत्यांपासून ५०० पोत्यांपर्यंत बटाटा लागवड करणारे शेतकरी या भागात आहेत.गेल्या दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता शेतकºयांनी यंदा ६० टक्केच बटाटा लागवड केली होती. त्यामुळे लागवड कमी झाल्याने बाजारभावात अपेक्षित वाढ होईल, ही अपेक्षादेखील आता फोल ठरत चालली आहे.पावसाचा सर्वाधिक फटका पारगाव तर्फे खेड व कुरवंडी भागाला बसला. त्या खालोखाल पेठ, थुगाव, भावडी या गावांतील देखील बहुतांशी बटाटा पीक सडले आहे. चालू हंगामात बटाटा पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.चालू वर्षात बटाट्याचे बाजारभाव वाढतील या आशेने अनेक शेतकºयांनी बटाटा पीक काढल्यावर अरणीमध्ये साठविले होते. परंतु, सतत पडणाºया पावसामुळे बटाटे सडले आहेत. अरणीतील निम्मे बटाटे फेकून देण्याचीवेळ शेतकºयांवर आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी