शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर खड्डे, दौंडज, वाल्हे परिसरात जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:32 IST

आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग असल्यामुळे केंद्र शासनाने ताब्यात घेतला आहे. आता तो सहापदरी होणार आहे. मात्र रस्त्याची दारुण अवस्था काही संपत नसून दौंडज व वाल्हे परिसरात रस्त्यावरील भरपूर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात.

वाल्हे  - आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग असल्यामुळे केंद्र शासनाने ताब्यात घेतला आहे. आता तो सहापदरी होणार आहे. मात्र रस्त्याची दारुण अवस्था काही संपत नसून दौंडज व वाल्हे परिसरात रस्त्यावरील भरपूर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात. प्रवास जीवघेणा ठरत आहे.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या रस्त्याने पंढरपूरला जात असतो त्यामुळे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी चार महिन्यापूर्वी हा संपूर्ण आळंदी ते पंढरपूर रस्ता दुरुस्त केला होता.तरी ही हा रस्ता चार महिन्यात एवढा खराब झाला आहे तो पाहवत नाही.खड्डे चुकवण्यात नादात या रस्त्यावर बरेच अपघात झाले आहेत कित्येक जणांचे बळी गले आहेत.मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.याच मार्गावर महाराष्ट्रचे कुलदैवत खंडेरायाची जेजुरी असल्यामुळे भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्याच बरोबर जेजुरी एमआयडीसी असल्यामुळे नीरा, जेऊर, मांडकी, वीर, हरणी, पिंगोरी, सुकलवाडी, दौडज ग्रामीण भागातील कामगार मोठया संख्येने मोटर सायकल वर कामावर जात आहेत.जेजुरी, सासवड या ठिकाणी कॉलेजला जाणार मोठा वर्ग आहे.या रस्त्यावर काही विध्यार्थी, एमआयडीसी चे कामगार ही अपघात मृत्यू मुखी पडले आहेत.पालखी मार्ग म्हणून दरवर्षी ज्या ठेकेदाराकडून शासन कामे करून घेत असते तो रस्ता कमीत कमी वर्षभर तरी चागला राहावा अशी ग्रामस्थां मध्ये चर्चा आहे. लवकरात लवकर पशासनाने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Potholeखड्डेAlandiआळंदीnewsबातम्या