पिंपरी सांडस : पिंपरी सांडस ते अष्टापूर फाटा या रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला असून, रात्रीच्या वेळी वाहनधारकांना छोट्या-मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. तसेच, परिसरातील रस्त्यांचीसुद्धा दुरवस्था झाली असून, दुरुस्तीची मागणी नागरिकांमधून होत आहे.पिंपरी सांडस, अष्टापूर फाटा परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करण्याबरोबरच अपघातासह वाहनांच्या होत असलेल्या नुकसानामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अष्टापूर फाट्यावरून पिंपरी सांडसकडे जाताना एक मोठा खड्डा रस्त्यावर पडल्यामुळे रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनाच्या लाईटचा प्रकाश डोळ्यावर पडल्यामुळे खड्डा दिसत नाही. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटनाही होऊ शकते. दुचाकी, चारचाकी वाहनचालकाला मोठा धोका पत्करावा लागतो. अनेक वेळा या खड्ड्यामुळे अपघातही झाले आहेत. संबंधित विभागने हा खड्डा बुजावा व परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून होत आहे.
मोठ्या खड्ड्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता
By admin | Updated: April 25, 2016 02:14 IST