शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण शिबिराला व्यापाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद; ५०० हून अधिक लोकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:14 IST

पुणे व्यापारी महासंघातर्फे लसीकरण शिबीर संपन्न

ठळक मुद्देपुढील लसीकरण शिबिरात सदस्य व कामगारांनीं मोठ्या संख्येने नावनोंदणी करावी

पुणे: पुणे व्यापारी महासंघ व पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने नूतन मराठी विद्यालय येथे वय वर्षे ४५ च्या वरील दुकानातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी विनामूल्य लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आज ५०० हून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले.

पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगारांचे लसीकरण करून घ्या. असे आवाहन पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया यांना भेटी दरम्यान केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत व्यापारी महासंघाने आपल्या सदस्यांना लसीकरणाला प्रवृत्त करत आगाऊ नोंदणी करून घेतली होती. प्रत्येकाचे रीतसर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेण्यात आले होते. लसीकरण झाल्यानंतर  प्रत्येक व्यक्तीस डॉक्टरांच्या निगराणी खाली अर्धा तास थांबवून अल्पोपहार चहा देऊन सोडण्यात आले.

सध्या लसींचा तुटवडा जाणवत आहे. लसी उपलब्ध झाल्यानंतर पुढील लसीकरण शिबीर घेण्यात येईल. असे व्यापारीमहासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका यांनी जाहीर केले. सदस्य व कामगारांनीं मोठ्या संख्येने नावनोंदणी करावी. ज्यामुळे नियोजन करणे सोपे जाईल. असे आवाहन सचिव महेंद्र पितळीया यांनी केले. याप्रसंगी पुणे महापालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ .वैशाली जाधव, वॉर्ड मेडिकल ऑफिसर डॉ .गोपाळ उजवानकर, राहूल हजारे ,मिलिंद शालगर ,नितीन काकडे, कुमार भोगशेट्टी, नितीन पोरवाल आदी उपस्थित होते.  

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका