शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

सकारात्मक आयुष्याची प्रेरणा

By admin | Updated: May 8, 2017 03:28 IST

‘एकल महिलांना आधार देणारे आणि मनमोकळेपणाने व्यक्त व्हायला लावणारे अभया मैत्री गटाचे व्यासपीठ आहे. एकमेकींना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘एकल महिलांना आधार देणारे आणि मनमोकळेपणाने व्यक्त व्हायला लावणारे अभया मैत्री गटाचे व्यासपीठ आहे. एकमेकींना भावनिक आधार देत सक्षमपणे उभे करण्याचे काम येथे होते. संघर्षातही सकारात्मक आयुष्य जगण्याची प्रेरणा महिलांना या मैत्री गटातून मिळतेय, ही आनंदाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन समुपदेशिका स्मिता जोशी यांनी केले.‘वंचित विकास’च्या अभया मैत्री गटातर्फे आयोजित ‘अभया सन्मान-२०१७’ प्रदान सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी माजी नगरसेविका सुनंदा गडाळे, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, संचालिका सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर, देवयानी गोंगले आदी उपस्थित होते. स्मिता जोशी म्हणाल्या, ‘एकटेपणाची जीवन जगताना तिला कोणाचातरी आधार हवा असतो. तो आधार आपणच एकमेकींना दिला पाहिजे. अडचणीत असलेल्या महिलांना आधार देण्यासाठी अभयासारख्या गटांबरोबर जोडून घेतले पाहिजे. चौकटीबाहेरचा विचार करण्याची प्रेरणाही या गटात मिळते.’सुनंदा गडाळे म्हणाल्या, ‘प्रत्येकाला आपले दु:ख मोठे वाटते. मात्र, या अकरा अभयांचा संघर्ष ऐकल्यानंतर आपले दु:ख काहीच वाटत नाही. प्रतिभा शिंदे, मीनाक्षी नागरे, चैत्राली वाघ, माया नवाडे, अनिता निकम, लीनता साने यांनी मानपत्र वाचन केले. देवयानी गोंगले यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.नेहा क्षीरसागर यांचा विशेष गौरवआयुष्यात एखाद्या वळणावर जोडीदाराचा हात सुटल्यानंतर वडिलांच्या एकटेपणाचा विचार करून त्यांना पुनर्विवाहास मदत करणाऱ्या व प्रोत्साहन देणाऱ्या नेहा क्षीरसागर यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. नेहा क्षीरसागर यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या वडिलांना उर्वरित आयुष्यात जोडीदाराचा आधार मिळाला आहे.यांचा झाला सन्मानप्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या अनुजा पाटील, डॉ. विदुला लागू, रत्नप्रभा निंबाळकर, अंजली पूजाधिकारी, अंजली महाजन, शुभदा यादव, कल्पना कुलकर्णी, मालती जोशी, माधवी कुंभार, अर्चना डोंगरे आणि छाया कुलकर्णी या ११ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.