शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

पॉप्युलर बूक हाऊस घेतेय वाचकांचा निरोप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 14:56 IST

पुणे : लेखक, खेळाडू, अभिनेते, राजकीय  नेते, उद्योगपती, गायक, शास्त्रज्ञ, शासकीय व पोलीस अधिकारी अशा दिग्गजांचे फर्ग्युसन रस्त्यावरील पॉप्युलर बूक हाऊसशी स्नेहबंध निर्माण झाले.

ठळक मुद्देमाधव लक्ष्मण गाडगीळ यांनी १० आॅक्टोबर १९५४ रोजी पॉप्युलर बुक हाऊसची स्थापना केली.पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, विक्रम गोखले, पं. हृदयनाथ मंगेशकर, अनुराधा पौडवाल, बाळासाहेब ठाकरे यांनी दुकानाला भेट दिली होती. देशा-परदेशातील वाचकांचेही हे आवडीचे ठिकाण होते. 

पुणे : गेली ६४ वर्षे हजारो वाचक, लेखक, प्राचार्य, ग्रंथपालांचे हक्काचे साहित्यस्थान असलेले फर्ग्युसन रस्त्यावरील पॉप्युलर बूक हाऊस वाचकांचा निरोप घेत आहे. करमणुकीची नवी साधने, वाचनाकडील कमी झालेली ओढ या कारणांमुळे पुस्तकविक्री घटल्याने हे बूक हाऊस बंद करण्याची वेळ ओढवली आहे. चार-पाच वर्षांपासून पुस्तकविक्रीचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. वाचनप्रेमी दुकानामध्ये येईनासे झाले आहेत. त्यामुळे बूक हाऊस काळाच्या पडद्याआड जाणार आहे.     पुस्तकांबरोबरच सीडी, व्हीसीडी,डिव्हीडी, आॅडिओ बुक्स, किंडल असे कालानुरुप होत गेलेले बदल ‘पॉप्युलर’ने सहज स्वीकारले. पहिले आॅनलाईन बुक स्टोर्स सुरू केले होते. मात्र, काही काळाने ते यशस्वीपणे चालू शकले नाही. फेसबुक, व्हाट्सअप, ईमेलच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या कायमच संपर्कात राहिलो. ‘टीम पीबीएच’ ह्या व्हाट्सअप ग्रूपने अनेक मित्र दिले. ह्या ग्रूपद्वारे आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवू शकलो, अशी प्रतिक्रिया सुनील गाडगीळ यांनी व्यक्त केली. परिस्थिती बदलली, आवड, प्राधान्यक्रम बदलल्या आणि बुक हाऊस बंद करावे लागणार  ह्या कटू सत्याला सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी केली. त्याच जागेत लवकरच एका नव्या रुपात, नव्या स्वरूपात आपल्या सेवेस येत आहोत, असेही ते म्हणाले.माधव लक्ष्मण गाडगीळ यांनी १० आॅक्टोबर १९५४ रोजी पॉप्युलर बुक हाऊसची स्थापना केली.  लेखक, खेळाडू, अभिनेते, राजकीय  नेते, उद्योगपती, गायक, शास्त्रज्ञ, शासकीय व पोलीस अधिकारी अशा दिग्गजांचे बूक हाऊसशी स्नेहबंध निर्माण झाले. वाचकांच्या तीन चार पिढया दुकानाशी जोडल्या गेल्या. पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, विक्रम गोखले, पं. हृदयनाथ मंगेशकर, अनुराधा पौडवाल, बाळासाहेब ठाकरे यांनी दुकानाला भेट दिली होती. देशा-परदेशातील वाचकांचेही हे आवडीचे ठिकाण होते. ------------------पुस्तकप्रेम आणि व्यवहार यामध्ये व्यवहाराची सरशी झाली. पुस्तकविक्रीचे प्रमाण घटल्याने तोटा सहन करत आणखी किती काळ दुकान सुरू ठेवायचे ही चिंता भेडसावत होती. ग्राहकांचा ओघ कमी झाल्याने पुस्तकांची विक्री होत नसल्याच्या कारणास्तव काही कर्मचाºयांना कमी करण्याची वेळ ओढवली. वर्षभर विचार केल्यानंतर आता हे दुकान बंद करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. दुकानातील उर्वरित माल वितरकांकडे पोहोचविल्यानंतर चार-पाच दिवसांत दुकान औपचारिकरित्या बंद होणार आहे. लवकरच आम्ही एका नव्या स्वरूपात पुणेकरांसमोर येणार आहोत. - सुनील गाडगीळ 

टॅग्स :Puneपुणे