शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या देखभाल दुरूस्तीची ‘पोलखोल’

By admin | Updated: August 7, 2016 04:24 IST

पावसाळ्यापूर्वी शहरातील देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याच्या महावितरणच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. ही कामे करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यच महावितरणकडे

पुणे : पावसाळ्यापूर्वी शहरातील देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याच्या महावितरणच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. ही कामे करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यच महावितरणकडे नसल्याची लेखी कबुली महावितरणने दिली आहे. तसेच या देखभाल दुरुस्तीसाठी मागविलेले साहित्य मुंबई कार्यालयाने जुलै संपल्यानंतरही पाठविले नसल्याचे माहिती अधिकारांतर्गत समोर आले आहे. त्यामुळे महावितरणने शहरात देखभाल दुरुस्ती खरंच केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून आवश्यकतेनुसार उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्राची देखभाल व दुरुस्तीची कामेर् तसेच डिस्क इन्सुलेटर बदलणे, तारा ओढणे, उपकेंद्र देखभाल, वाकलेले वीजखांब सरळ करणे, गंजलेले, तुटलेले वीजखांब बदलणे, ब्रेकर्सर्ची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, आॅईल फिल्टरेशन, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची कटाई, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजतारा बदलणे या कामांसह इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. दर वर्षी ही कामे ३१ मेअखेर पूर्ण केली जातात. या वर्षीही जूनच्या सुरुवातीलाच ही कामे सुमारे ९० टक्के झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले होते. या संदर्भात सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे परिमंडळात तसेच विभागनिहाय देखभाल दुरुस्तीसाठी साहित्याची मागणी झाली आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्याबाबत उत्तर देताना महावितरणच्या मंडलनिहाय विभागांकडून झालेल्या मागणीनुसार, २७ मे रोजी साहित्य मागविण्यात आले होते. मात्र, अद्याप ते मिळाले नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. पहिल्याच पावसात उडाला होता फज्जा शहरात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पावसाला सुरूवात झाली. मात्र, या अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या कामाने शहरात महावितरणच्या देखभाल दुरूस्तीच्या कामांचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. त्यामुळे जवळपास अर्धे शहर दोन दिवस टप्प्या टप्प्याने अंधारात होते. त्यामुळे महावितरणकडून नक्की पावसाळ्यापूर्वी कामे झाली का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, माहिती अधिकारात देण्यात आलेल्या माहितीवरून ही कामे झालीच नसल्याचे समोर येत आहे.शहरात महावितरणचे सर्वाधिक २२ लाख ग्राहक आहेत. तर, राज्यात सर्वाधिक उत्पन्नही पुण्यातून मिळते, तसेच पुण्यात वीजचोरी व गळतीचे प्रमाणही कमी आहे. असे असतानाही पुणे विभागाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.