शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या वक्तव्यावरूनही रंगले राजकारण

By admin | Updated: November 8, 2016 01:53 IST

‘पुणे शहरातील कचऱ्याची लाज वाटते’ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या वक्तव्यावरून राजकारण रंगले

पुणे : ‘पुणे शहरातील कचऱ्याची लाज वाटते’ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या वक्तव्यावरून राजकारण रंगले. महापालिका सर्वसाधारण सभेत त्यांच्या वक्तव्यावरून सोमवारी गदारोळ झाला. खासदार चव्हाण यांचे हे वक्तव्य पुणेकरांचा अवमान करणारे आहे, अशी टीका करीत त्यांचा निषेध करून सभा तहकूब करण्याचा ठराव ३९ विरुद्ध २१ अशा बहुमताने मंजूर करण्यात आला. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला; मात्र पक्षाचेच नगरसेवक सुभाष जगताप यांनी आपण चव्हाण यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे स्पष्ट करून त्याला सुरूंग लावला.काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन खासदार चव्हाण यांनी शनिवारी महापौर प्रशांत जगताप यांना शहरातील कचऱ्याची समस्या अत्यंत बिकट झाली असल्याचे निवेदन दिले. त्या वेळी बोलताना त्यांनी या शहरातील कचऱ्याची लाज वाटते, असे वक्तव्य केले. सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवातच भाजपाच्या नगरसेवकांनी खासदार चव्हाण यांच्या निषेधाचे फलक फडकावीत केली. महापौरांच्या आसनासमोर जमा होत पक्षाच्या मुक्ता टिळक, वर्षा तापकीर, अस्मिता शिंदे, आदी महिला नगरसेवकांनी गटनेते गणेश बिडकर यांच्या नेतृत्वखाली घोषणा देण्यास सुरुवात केली. धनंजय जाधव, श्रीकांत जगताप, अशोक येनपुरे, दिलीप काळोखे या नगरसेवकांनी त्यांच्या साथीने लगेचच आरडाओरडा सुरू केला. खासदार चव्हाण यांचा निषेध असो, अशा घोषणा देण्यात येत होत्या.त्यांना प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर, वैशाली बनकर, संजिला पठारे व अन्य महिला नगरसेवकांनी सभागृह नेते बंडू केमसे यांच्या बरोबरीने चव्हाण यांचे समर्थन करणाऱ्या घोषणा सुरू केल्या. राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी भाजपाचा निषेध सुरू केला. ध्वनिक्षेपकाची पळवापळवी, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, मोठ्याने ओरडणे असे बरेच प्रकार सुरू झाले. महापौर जगताप, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे याला आवर घालण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.बिडकर यांनी खासदार चव्हाण यांचा निषेध म्हणून सभा तहकूब करावी, अशी सूचना दिली. त्याचे वाचन न करताच महापौरांनी ती स्वीकारत नसल्याचे जाहीर केले. सूचना वाचलीच पाहिजे, त्याशिवाय निर्णय घेता येणार नाही, असे बिडकर म्हणाले. अखेरीस महापौरांनी बोलण्याची संधी देतो, असे सांगून मनीषा घाटे यांचे नाव पुकारले. घाटे यांच्यासह बिडकर, शिंदे, अशोक हरणावळ, वसंत मोरे, वनिता वागसकर आदींनी पुणे शहराचा आम्हाला अभिमान आहे, असे म्हणत खासदार चव्हाण यांचा निषेध केला.राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार त्यांच्या भाषणात अडथळे आणले जात होते. मात्र राष्ट्रवादीच्याच सुभाष जगताप यांनी खासदार चव्हाण यांच्यावर टीका केली. त्याच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही, त्यांनी पुणे शहराचा तसेच कचरा निर्मुलनाचे काम करणाऱ्या हजारो चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा अपमान केला आहे असे ते म्हणाले. भाजपच्या सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. नंदा लोणकर, केमसे यांनी चव्हाण यांचे समर्थन केले.