शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

मावळात धुमसतेय राजकीय वैमनस्य

By admin | Updated: October 17, 2016 01:26 IST

खडकाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज यांचा भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण खून झाला होता

पिंपरी : गतवर्षी कामशेतजवळील खडकाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज यांचा भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण खून झाला होता. मतदानाच्या दिवशीच झालेल्या या खुनाच्या घटनेनंतर दीड वर्षात खुनाच्या आणखी घटना घडल्या. महिनाभरापूर्वीच तळेगाव नगर परिषदेचे सदस्य व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा कट फसला. हल्ल्याच्या तयारीत आलेले शस्त्रधारी आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने ही घटना टळली. काही दिवस उलटताच रविवारी भरदिवसा तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा निर्घृण खून झाला. मावळात राजकीय वैमनस्य धुमसत असल्याचा प्रत्यय या घटनांतून आला आहे.तळेगावात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असून, त्यांचा उपद्रव वेळोवेळी जाणवतो. सुपारी देऊन खून केल्याच्या घटना तळेगावसह मावळ तालुक्यात घडल्या आहेत. ग्रामपंचायत अथवा नगर परिषदेची निवडणूक असते, त्या वेळी या गुन्हेगारी टोळ्या अधिक सक्रिय होतात. राजकीय वैमनस्यातून घडणाऱ्या घटना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे संकेत देणाऱ्या आहेत. लोकप्रतिनिधी अथवा समाज संघटनाचे काम करणाऱ्यांवर असे हल्ले होत असतील, तर सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अशा घटनांमुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. २०१० मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचा तळेगाव येथे भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी खून झाला होता. शेट्टी यांच्या खुनाच्या खळबळजनक घटनेने राज्यभर तळेगावच्या गुन्हेगारीची चर्चा झाली. मुंबई, पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये खुनाच्या गंभीर घटना घडतात. परंतु त्या घटना गुन्हेगारी टोळ्यांमध्ये घडत असतात. शहरामध्ये राजकारणी अथवा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्य केले जात नाही. तळेगाव आणि मावळ परिसरात मात्र राजकीय व्यक्तींना टार्गेट केले जात आहे. सुपारी घेणाऱ्या गुंडांच्या टोळ्या या भागात कार्यरत आहेत. या परिसरातील गुन्हेगारी वेगळ्या स्वरूपाची असून, गुन्हेगारीला राजाश्रय मिळू लागला असल्याचे बोलले जात आहे. मावळातील आंबेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता रसाळ यांचा सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक होताच राजकीय वैमनस्यातूनच काटा काढला. ग्रामपंचायत ते नगर परिषद निवडणुकीच्या वेळी अशा घटना घडू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)>चार संशयित ताब्यातसचिन शेळके यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तळेगावात या प्रकरणामुळे तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच हत्याप्रकणातील हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. रविवारी रात्री शेळके यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी साथीदारांचा तपास सुरू असल्याचे पोलीस सांगितले.>पोलिसांचे दुर्लक्ष : गुन्हेगारी आळा घालामावळ परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव आलेला आहे. तळेगाव, कामशेत, लोणावळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गृह प्रकल्प विकसित होत आहेत. त्यामुळे जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून धमकावणे, मारामाऱ्या करणे असे गुन्हे वाढू लागले आहेत. वाढत्या गुन्हेगारीकडे ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण पोलिसांच्या आशीर्वादानेच मावळ परिसरात भाईगिरी वाढली आहे. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मावळ परिसरात सुजाण नागरिक करीत आहेत.