शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

पोलीस बंदोबस्तात खडकवासला धरणातून पाणी सोडणार

By admin | Updated: May 4, 2016 04:35 IST

खडकवासला धरणातील पाणी दौंड, इंदापूरला पिण्यासाठी नवा मुठा उजवा कालव्यातून पोलीस बंदोबस्तात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य

यवत : खडकवासला धरणातील पाणी दौंड, इंदापूरला पिण्यासाठी नवा मुठा उजवा कालव्यातून पोलीस बंदोबस्तात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार यांनी दिली.मंगळवारी (दि. ३) यवत (ता.दौंड) येथे पुरंदर-दौंडचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता बी.बी. लोहार, दौंड विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मोरे, दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे, दौंडचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे, यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत चव्हाण, भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पाटबंधारे खात्याचे अधिकारी व्ही. एन. जाधव, सुहास साळुंखे, आर. डी. गायकवाड, पी. डी. शिंदे, विद्युत वितरण कंपनीचे, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दौंड, इंदापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत असल्याने पाणी सोडण्यात येणार आहे. खडकवासला धरणातील पाणी मंगळवारपासून (दि.३) १३ मेपर्यंय नवा मुठा उजव्या कालव्यातून १ टीएमसी सोडण्यात येणार आहे. पाण्याच्या पाण्याचा शासकीय पुरवठा ज्या तलावातून होतो त्या तरंगवाडी, शिर्सुफळ (ता. इंदापूर), दौंड शहराला पाणीपुरवठा करणारा तलाव, वरवंड, माटोबा, खामगाव-शेलारवाडी (ता.दौंड) हे पिण्याच्या पाण्याचे तलाव, तसेच नवा मुठा उजव्या कालव्याचे जवळ असलेल्या हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या विहिरी या सोडण्यात येणाऱ्या खडकवासल्याच्या पाण्यातून भरणार आहेत. खडकवासला धरणातील पाणी नवा मुठा उजव्या कालव्यातून सोडताना या कालव्यावरील सर्व उपसा सिंचन पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. संपूर्ण कालव्यावर सात भरारी पथके दिवसरात्र तैनात करण्यात आली आहेत. कालव्यावरील सर्व वितरिकांचे दरवाजे पूर्णपणे वेल्डिंग करण्यात आले आहेत.हे पाणी फक्त पिण्यासाठीच सोडण्यात येणार आहे. नागरिकांनी, शेतकऱ्यांनी कोणतीही गडबड-गोंधळ करू नये. या भरारी पथकात पोलीस, महसूल, पाटबंधारे, विद्युत विभागाचे अधिकारी असणार आहेतनवा मुठा उजव्या कालव्याचे पाणी फक्त पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. या कालव्याद्वारे पाणी चालू असेपर्यंत दोन कार्यकारी अभियंता, चार उप-अभियंता, पंचवीस शाखा अभियंता, चाळीस कालवा निरीक्षक, तीनशेचे जवळपास इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सात भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. खडकवासला धरण ते इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावात जेथून पाणी सोडण्यात येणार आहे ते २०२ किमी अतंरात प्रत्येक भरारी पथक साधारण पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर दिवसरात्र व्हीडीओ शूटिंग करणार आहे.- डी. बी. लोहार, मुख्य कार्यकारी अभियंताखडकवासला धरणापासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. फुरसुंगी ते इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे. हे पाणी पिण्यासाठीच सोडण्यात येणार आहे. दरम्यानच्या कालावधीत पाणी चोरी करणारांची गय केली जाणार नाही.- राजेंद्र मोर,पोलीस उपअधिक्षक, दौंड विभाग