शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पोलिसांसाठी खासगी गृहप्रकल्पात घरे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 05:50 IST

पोलिसांनाही हक्काचे घर मिळावे, यासाठी खासगी विकासकांच्या मदतीने स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दिली जात आहेत.

टिटवाळा : पोलिसांनाही हक्काचे घर मिळावे, यासाठी खासगी विकासकांच्या मदतीने स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांसाठी घरे तयार होत आहेत. या इमारतींच्या रेडीरेकनरचे दर कमी करण्यासंदर्भात किंवा नोंदणी शुल्क आणि स्टॅम ड्युटीमध्ये सवलत मिळावी, यासाठी मी मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहे. मात्र, त्यानंतरही दर कमी न झाल्यास पोलीस वेलफेअर फंडातून ही फरकाची रक्कम कर्जाच्या स्वरूपात दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार केले जाईल, असे आश्वासन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी टिटवाळानजीकच्या बल्याणी येथे घरांच्या भूमिपूजन कार्यक्र मात दिले.पोलिसांसमोर हक्काच्या घरांचा प्रश्न आहे. मात्र, सातव्या वेतन आयोग येऊ घातला आहे. त्यामुळे काही प्रमाणात पोलिसांचे पगार वाढणार आहेत. अनेक वित्त संस्था पोलिसांना कर्जपुरवठा करण्यास तयार आहेत. त्यामुळे हक्काचे घर घेण्याची हीच वेळ आहे. म्हाडा आणि सिडकोनेही या योजनेतून पोलिसांना घरे देण्यासाठी सकारात्मकता दाखविली असल्याचे त्यांनी सांगितले.>ठाणे जिल्ह्यातील बल्याण येथे ३३० घरेठाणे ग्रामीण पोलीस हद्दीत टिटवाळाजवळील बल्याणी येथील गृहसंकुलातील १० मजली इमारतींमध्ये वन बीएचकेची २३०, तर टू बीएच केची १०० घरे तयार केली जाणार आहेत. त्यातील १६७ घरे पोलिसांनी घरे बुक केली आहेत. उर्वरित पोलिसांनाही घरे देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. बाजार भावापेक्षा ३५ टक्के कमी दराने ही घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. तर पाच जिल्ह्यांत ६६७ पोलिसांनी घरे बुक केली आहेत. २०१९ च्या शेवटी हक्काच्या घरांचा ताबा पोलिसांना मिळणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.