पुणे : वानवडी येथील गुप्तवार्ता विभागातील महिला पोलिसांना शिवीगाळ करुन विनयभंग करणाºया पोलीस कर्मचाºयाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे़ निलेश भालेराव (वय २८, रा़ मुंबई) असे त्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश भालेराव हा मुंबई पोलीस दलात सुरक्षा विभागात कामाला आहे़ तो वानवडी येथील गुप्तवार्ता विभागात असलेल्या प्रशिक्षणासाठी आला होता़ त्यावेळी त्याचे तेथील महिला पोलिसांबरोबर ओळख झाली होती़ सोमवारी तो तेथे आला असताना मोबाईलवर पाठविलेल्या मेसेजवरुन त्यांच्यात वाद झाला़ त्यावेळी निलेश याने त्यांना शिवीगाळ केली़ महिला पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वानवडी पोलिसांनी भालेराव याला अटक केली आहे़ त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली़
महिला पोलिसांना शिवीगाळ करुन विनयभंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला वानवडीत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 14:05 IST
वानवडी येथील गुप्तवार्ता विभागातील महिला पोलिसांना शिवीगाळ करुन विनयभंग करणाºया पोलीस कर्मचाºयाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे़ निलेश भालेराव (वय २८, रा़ मुंबई) असे त्याचे नाव आहे.
महिला पोलिसांना शिवीगाळ करुन विनयभंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला वानवडीत अटक
ठळक मुद्देमुंबई पोलीस दलात सुरक्षा विभागात कामाला आहे़ निलेश भालेराव वानवडी पोलिसांनी भालेराव याला केली अटक