शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर सोडण्यासाठी १५ हजारांची मागणी; संशय येताच पैसे टाकून पळाला पोलीस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 11:22 IST

पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाक्यावरील प्रकार

पुणे : चेन्नईहून राजकोटला जाणार्‍या कंटेनरला सोडण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. त्या सहायक पोलीस निरीक्षकाने पैसेही स्वीकारले. त्याचवेळी त्याला संशय आला. तेव्हा तो पैसे तसेच टाकून आपली कार बेदकारपणे चालवत पळून गेला. पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर हा थरार घडला.सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित रामचंद्र अधटराव (महामार्ग सुरक्षा पथक, वडगाव) असे या पोलीस अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदार हे बालरोड लाइन्स यांचे हायड्रॉलिक/एक्सएल गाडीवर चालक असून ते गाडीतून पवनचक्कीचे नेसल घेऊन चेन्नईहून राजकोटला जात होते. तक्रारदार व त्यांचे सहकारी अशा २ गाड्या सत्यजित अधटराव याने पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्यावर अडवल्या. ही दोन्ही वाहने लॉकडाऊन उठल्यानंतर (३मे) सोडली जातील, असे कंटेनर चालकाला त्याने सांगितले. गाड्या सोडायच्या असतील तर प्रत्येक गाडीचे १० हजार रुपये असे २० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. चालकांनी लाचलुचपत प्रतिबंधिक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर तडजोडीअंती त्याने १५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले.त्यानुसार पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक सुनिल बिले, काँस्टेबल दीपक टिळेकर, अंकुश माने, चंद्रकांत कदम यांनी उर्से टोलनाक्यावर रात्री सव्वा नऊ वाजता सापळा रचला. तक्रारदार याच्याकडून सत्यजित अधटराव याने १५ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर त्याला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम टेबलवर फेकून दिली व आपल्या कारमध्ये बसून वेगाने तो पुण्याकडे पळून गेला. पोलिसांनी वडगाव पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण