शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनाच बनावट ई-चलानचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:26 IST

ई-चलानद्वारे वाहतूक पोलीस पाठवत असलेल्या मेसेजसारखेच बनावट मेसेज तयार करून दंड भरला असल्याचे भासवत

पुणे : ई-चलानद्वारे वाहतूक पोलीस पाठवत असलेल्या मेसेजसारखेच बनावट मेसेज तयार करून दंड भरला असल्याचे भासवत पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकून शासनासह वाहतूक विभागाला गंडा घालणारा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. तब्बल ३९९ बनावट मेसेज तयार करून ते ३९ व्यक्तींना पाठवत ८१ हजार २१२ रुपयांची फसवणूक त्याने केल्याचे समोर आले आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान हा प्रकार सुरू होता.असिफ अरीफ शेख (रा. झांबरे पॅलेस महर्षीनगर कोंढवा) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन लव्हज चौकात स्वारगेट वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करीत असताना असिफ शेखने त्याच्या मोबाईलवरील मेसेज दाखवून अगोदरच दंड भरल्याचे सांगितले. पोलिसांना या मेसेजचा संशय आला. त्यांनी तो बारकाईने पाहिला असता बनावट असल्याचे दिसून आले. मोबाईल तपासला असता स्वत:च्या मोबाईलवर पुणे पोलीस ई चलानद्वारे जसे मेसेज पाठवितात त्यासारखेच दंड भरल्याचे बनावट मेसेज मोबाईलच्या मेसेज इनबॉक्समध्ये त्याने ३९ लोकांना पाठवल्याचे आढळले. बनावट मेसेज असूनही वाहतूक पोलिसांनी केलेल्या दंडात्मक कारवाईचेच हे मेसेज असल्याचे भासवत पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाहतूक शाखा परिमंडळ २चे सहायक पोलीस निरीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर, पोलीस शिपाई जगताप आणि पोलीस शिपाई कोंडे यांनी कारवाई केली.

टॅग्स :Policeपोलिस