शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गजेंद्र चौहानांविरोधात निदर्शने करणा-या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार

By admin | Updated: January 7, 2016 11:23 IST

एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या आगमनापूर्वी पुन्हा आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला तसेच काहींना ताब्यातही घेतले.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ७ -  फिल्म अँड टेलिव्हिज इन्स्टिट्यूटच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या विरोधात चार महिने संप करणा-या विद्यार्थ्यांनी आज चौहान यांच्या आगमनापूर्वी पुन्हा आंदोलन केल्याने एफटीआयआयच्या परिसरातील वातावरण तापले. 'गजेंद्र चौहान हाय हाय', ' गजेंद्र चौहान वापस जाओ' अशा घोषणांनी एफटीआयआयचा परिसर दणाणून गेला होता. आक्रमक विद्यार्थ्यांना थोपवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला तसेच काही विद्यार्थ्यांना ताब्यातही घेतले. 
चार महिने चाललेले आंदोलन, संप यानंतरही अभिनेते व भाजपा कार्यकर्ते गजेंद्र चौहान आज पुण्यातील एफटीआयआयचे अध्यक्षपद स्वीकारणार असून आज पहिल्यांदाच ते पहिल्यादांच ते एफटीआयआयमध्ये दाखल होतील. मात्र त्यांना विरोध दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा निदर्शनाचे शस्त्र हाती घेतले असून आज सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी एफटीआयआयच्या परिसरात चौहान यांच्याविरोधात घोषणा दिल्या तसेच मोर्चाही काढला. पोलिसांनी काल काही विद्यार्थ्यांना नोटीसही बजावली होती, मात्र तरीही आज विद्यार्थी रस्त्यावर उतरलेच.
गजेंद्र चौहान यांनाअध्यक्षपदी नियुक्त करुन केंद्र सरकार संस्थेत हस्तक्षेप करत असून त्यांची निवड करताना अनेक पात्र व्यक्तींना डावलंल गेलं, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी तब्बल १३९ दिवस संपही केला होता.