पुणे : शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत सराईत गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. कोणीही येतो आणि गाडय़ा पेटवून देतो. भरदिवसा हल्ले होतात, संघटित गुन्हेगारी वाढली आहे, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच राहिला नाही. मुंबईसारखीच परिस्थिती सध्या पुण्यात निर्माण झाली आहे. गुन्हेगारांच्या टोळ्या वाढत असल्याचे गुरुवारी सांगत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सरकारला ‘घरचा’ आहेर दिला. दोन दिवसांपूर्वीच सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील राज्यातील गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे म्हटले होते.
पर्वती येथे दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पाश्र्वभूमीवर एकाच गटाच्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई होत असल्याच्या आरोप करत शिवसेनेने मोर्चा काढला होता. शासनाच्या वतीने या मोर्चाचे निवेदन घेण्यासाठी शिवतारे स्वत: उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवतारे म्हणाले, ‘‘सिंहगड रोडवर 7क्-8क् वाहने पेटवली गेली. मिलिंद एकबोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. क्षुल्लक कारणावरून पर्वती येथे दोन गटांत संघर्ष निर्माण होतो. पोलिसांनी या गुन्हेगारावर वेळीच कडक कारवाई केली नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल. गुन्हेगारांवर कारवाई करताना सर्वाना सारखा न्याय द्यावा; अन्यथा पोलिसांबद्दल अविश्वास निर्माण होईल.’’
पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पाश्र्वभूमीवर अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणा:या स्वतंत्र बैठकीत सर्व परिस्थितीची माहिती देण्यात येणार असल्याचे शिवतारे म्हणाले. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांना हटविण्याची मागणी सेनेतर्फे होत आहे. तुम्हीही मुख्यमंत्र्याकडे ही मागणी करणार का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, पुण्यातील गुन्हेगारी मोडून काढण्याची संधी देण्यात आली आहे, ती पेलणो शक्य नसेल तर राजीनामा द्यावा. शहर संघटक अजय भोसले, श्याम देशपांडे, सचिन तावरे, पालिकेतील गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक सचिन भगत, दीपाली ओसवाल, सोनम झेंडे, विजय देशमुख, नीता मंजाळकर, संगीता ठोसर, प्रशांत बधे, संजय भोसले, जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ, शहर उपप्रमुख बाळा ओसवाल, सागर माळकर, तानाजी लोणकर, विलास सोनावणे, गजानन पंडित, संदीप मोरे, संजय मोरे, अमोल हरपळे, राधिका हरिश्चंद्रे, नितीन भुजबळ, किरण साळी आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)निम्हण यांच्या विरोधात गुन्हा दाखलपुणे: जमाव बंदीच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण यांच्या विरोधात दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पर्वती दर्शन येथे दोन गटात हाणामारी झाल्यामुळे पोलिसांनी या भागात जमाव बंदीचे आदेश काढले होते.तसेच या भागात कोणीही जमाव करू नये, असे आवाहन केले होते.मात्र,शिवसेनेच्या वतीने हाणामारीच्या निषेधार्थ पर्वती दर्शन भागातील एका मंदीरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह या भाग गर्दी करून आरती केली.त्यामुळे दत्तवाडी पोलिसांनी निम्हण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे,असे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले. तेव्हा पोलीस कुठे होते ? गेल्या काही दिवसांत शहरात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजकंटक करीत आहेत. सिंहगड व शिवदर्शन येथे मोठ्या घटना घडल्या. तेव्हा पोलीस कुठे गेले होते? असा सवाल विनायक निम्हण यांनी उपस्थित केला आहे. अधिकाऱ्यांची लवकरच बैठक : शिवतारे शिवसेनेच्या मोर्चामध्ये काही वेळाने विजय शिवतारे सामील झाले. त्या वेळी शिवतारे म्हणाले, शहरातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. एकबोटे यांच्यावरील हल्ला, पर्वर्ती भागातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे.