शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कोठडीची सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:11 IST

राजगुरुनगर येथील सबजेलची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. काल दोन आरोपींनी स्वच्छतागृहाच्या खिडकीचे गज कापून पलायन केले.

- राजेंद्र मांजरेदावडी : राजगुरुनगर येथील सबजेलची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. काल दोन आरोपींनी स्वच्छतागृहाच्या खिडकीचे गज कापून पलायन केले. या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. गज व खिडकीची जाळी कापेपर्यंत पोलीस झोपी गेले होते काय? अशा तर्क- वितर्काला तालुक्यात उधाण आले. त्यामुळे पोलिसांच्या कायदा- सुव्यवस्थेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तहसील कार्यालयालगत सबजेलची इमारत आहे. ही इमारत ब्रिटिशकालीन असून, तेव्हापासून आरोपींना येथे ठेवण्यात येते. या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शहराचा व या परिसरातील गावांचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे अनेक भांडणे, खून, मारामाऱ्या, चोरी, बलात्कार इ. घटना सर्रास घडतात. त्यामुळे कोठडी नेहमी आरोपींनी भरलेली असते. कुणीही यावे अन् पोलिसांना चिरीमिरी देऊन आरोपीला भेटावे. आरोपीला बाहेरचे खाण्यास आणून देणे, असे प्रकार येथे नेहमीच घडतात. आरोपींना तंबाखू, गुटखा, दारू पुरवणे असेही प्रकार येथे यापूर्वीही घडलेले आहेत. कस्टडीतील आरोपींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले गार्ड व पोलीस यांच्यावर वरिष्ठांचा कुठल्याही प्रकारचा धाक नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसते की आरोपी पळाले तेव्हा आमचे गार्ड कर्मचारी जागे होते, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.>दोन दिवसांपूर्वी विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२, रा. मंचर, ता. आंबेगाव) आणि राहुल देवराम गोयेकर (वय २३, रा. गोयेकरवाडी, ता. कर्जत) या दोन आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. कोठडीच्या पाठीमागील स्वच्छतागृहाच्या खिडकीचे लोखंडी गज बाहेरील व्यक्तीने कापून आरोपींना मदत केली. दरम्यान आमचे कर्मचारी जागे होते, असे पोलीस म्हणतात. त्या वेळी पोलिसांना काही आवाज का आला नाही, पोलीस गार्ड जिथे बसतात व आरोपी ज्या खिडकीवाटे पळाले ते अंतर फक्त १५ फुटांचे आहे.>या सबजेल आरोपींना बाहेरील काही दिसू नये म्हणून बाहेरच्या बाजूने, व्हरांड्यातील आवाराच्या बाहेरच्या बाजूने शेडनेट-हिरवी जाळी लावण्यात आली. मात्र, आरोपींचे मित्र, नातेवाईक या शेडनेटची जाळी फाडून सबजेलमध्ये असण्याºया आरोपी व्यक्तीशी गप्पा मारतात. त्याला पोलीस गार्ड कुठलाही अटकाव करत नसल्याचे चित्र आहे.खेड पोलीस ठाण्यात गेल्या काही महिन्यांपासून एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पाच सहायक पोलीस निरीक्षक नवीन आले आहेत. तसेच अनेक कर्मचारी नवीन बदलून आले आहेत. त्यामुळे कोण काय करतोय, याचा काही मेळ बसत नाही. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी अनेक अवैध धंदे, मटका, जुगार सर्रास सुरूच आहेत. लॉजिंग तसेच गावागावांत काही ठिकाणी सुरू असलेल्या दारू हातभट्ट्याही नियमितपणे सुरू आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याला मोठा हप्ता मिळतो, अशी चर्चा आहे. दोन पोलीस तर फक्त हप्ते गोळा करण्यातच मग्न असतात.