शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी महिलांसाठी बनवले ‘प्रतिसाद अ‍ॅप’

By admin | Updated: March 14, 2016 01:11 IST

पोलिसांनी महिलांच्या तत्काळ मदतीसाठी ‘प्रतिसाद’ अ‍ॅप सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर या अ‍ॅपची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड स्तरावर केली जाणार आहे.

चिंचवड : पोलिसांनी महिलांच्या तत्काळ मदतीसाठी ‘प्रतिसाद’ अ‍ॅप सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर या अ‍ॅपची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड स्तरावर केली जाणार आहे. केवळ महिलाच नाही तर संकटसमयी या अ‍ॅपचा उपयोग इतर नागरिकांनाही करता येणार आहे. तातडीने पोलिसांची मदत मिळविण्यासाठी महिलांनी या अ‍ॅपचा वापर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे. अ‍ॅप सहजरीत्या मोबाइलवरून डाऊनलोड करता येते. अँड्रॉइड सुविधा असणाऱ्या मोबाइलमध्ये या अ‍ॅपची सुविधा उपलब्ध आहे. गुगल सर्चमध्ये प्रतिसाद (आस्क) टाइप केल्यानंतर ते अ‍ॅप मोबाइलवर उपलब्ध होते. अ‍ॅप डाऊनलोड झाल्यानंतर त्यामध्ये स्वत:चा मोबाइल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर अ‍ॅपमध्ये कोड विचारला जाईल. त्याअनुसार अटी व शर्ती मान्य करून बटण क्लिक करायचे आहे. त्यानंतर संबंधित महिलेचे अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन होईल. अ‍ॅप डाऊनलोड झाल्यानंतर स्क्रीनवर लाल रंगाचा ‘सोशल एमर्जन्सी’ नावाचा आयकॉन येईल. जेव्हा अडचणीच्या वेळेत पोलिसांची गरज भासेल, तेव्हा आयकॉनवर क्लिक केल्यास पोलीस तत्काळ त्याच नंबरवर संपर्क साधतील. याकरिता पुणे शहर पोलिसांकडून या अ‍ॅपचा लाभ महिलांनी घ्यावा. (प्रतिनिधी)