शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

निधीअभावी मोडले ‘पीएमपी’चे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 02:02 IST

खर्चाचा ताळेबंद जुळेना : वेतन मिळेना वेळेवर, सुट्या भागांअभावी अनेक बस बंद

राजानंद मोरे पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेचे पुरेशा निधीअभावी कंबरडे मोडले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तोटा वाढू लागल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न होणे, बससाठी सुटे भाग घेण्यातील अडचणी, देखभाल-दुरुस्तीवर परिणाम अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच पुढील वर्षभरात नवीन वर्षात ई-बस व सीएनजी बस ताफ्यात येणार असल्याने खर्चाचा भार आणखी वाढणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह लगतच्या परिसरातील सुमारे दहा लाख प्रवाशांना ‘पीएमपी’मार्फत बससेवा पुरविली जाते. सध्या मालकीच्या १३८४, तर भाडेतत्त्वावरील ६५३ बस अशा एकूण २०३७ बस आहेत. मात्र, विविध कारणांमुळे यापैकी जवळपास पाचशेहून अधिक बस मार्गावर येत नाहीत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने संचलन होत नाही. परिणामी प्रवाशांना बससाठी अनेकदा तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. तसेच अनेक बस जुन्या असल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत. बे्रकडाऊनचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. या कारणांमुळे प्रवासीसंख्येत अपेक्षित वाढ झालेली नाही. दुसरीकडे दैनंदिन खर्चाचा बोजा वाढतच चालला आहे. सर्वाधिक ५१ टक्के खर्च कर्मचारी व अधिकाºयांच्या वेतनावर होतो. वेतनासाठी दरमहा ३६ कोटींहून अधिक पैसे लागतात. त्यानंतर भाडेतत्त्वावरील बसेसचे भाडे द्यावे लागते. देखभाल-दुरुस्ती, सुट्टे भाग अशा विविध कारणांसाठीही मोठा खर्च होतो. पीएमपीला तिकीट विक्री, पास, जाहिरात, दंडाच्या माध्यमातून एकूण खर्चाच्या केवळ ७५ टक्के उत्पन्न मिळते. तर दोन्ही महापालिकांकडून संचलन तुटीच्या रूपाने २५ टक्के रक्कम मिळते.पीएमपीला तिकीट व पास विक्रीतून दररोज १ कोटी ३५ लाख ते १ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. वाढता खर्च आणि अपेक्षित उत्पन्न वाढत नसल्याने मागील वर्षी तब्बल २०४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. हा तोटा यंदा वाढणार असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने मागील दोन महिने अधिकारी व कर्मचाºयांचे वेतन वेळेवर देणे शक्य झालेले नाही. सीएनजी गॅसचे सुमारे ३७ कोटी रुपये थकले आहेत.सुट्टे भाग पुरवठा करणाºया पुरवठादारांचेही लाखो रुपयांचे देणे आहे. त्यामुळे सुटे भाग वेळेवर मिळत नाहीत. परिणामी बस देखभाल-दुरुस्तीवर परिणाम होत आहे.५० बस मार्गावरच बंद पडतातनिधीअभावी सुटे भाग वेळेवर मिळणे कठीण होत चालले आहे. परिणामी विविध सुटे भाग नसल्याने पीएमपीच्या ७० हून अधिक आगारातच धुळ खात उभ्या असतात. तर देखभाल-दुरूस्तीसाठी ६० हून अधिक बस मार्गावर येत नाहीत.गुरूवारी चालक नसणे किंवा इतर कारणांमुळे ४२ बस सुस्थितीत असूनही मार्गावर आणता आल्या नाहीत. पीएमपीच्या मालकीच्या एकुण १३८४ पैकी केवळ १०४६ बस गुरूवारी मार्गावर होत्या. त्यातच दररोज ५० हून अधिक बस मार्गावरच बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर बससेवा देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. 

टॅग्स :Puneपुणे