शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

‘पीएमआरडीए’ने देखील संचलन तूट द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST

पुणे : ज्याप्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमपीएमएलला संचलन तूट देतात, त्याप्रमाणे पुणे महानगर क्षेत्र विकास महामंडळानेदेखील संचलन तूट ...

पुणे : ज्याप्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमपीएमएलला संचलन तूट देतात, त्याप्रमाणे पुणे महानगर क्षेत्र विकास महामंडळानेदेखील संचलन तूट द्यावी. पीएमपीच्या बससेवेचा विस्तार पीएमआरडीएच्या हद्दीपर्यंत झाला आहे. त्याला संचालक मंडळाने मान्यताही दिलेली आहे. त्यानुसार महामंडळाने पीएमआरडीएच्या हद्दीत बसमार्ग देखील सुरू केले असून संचलन तूट देण्याविषयी पीएमआरडीएशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, पीएमआरडीएकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, त्यांनी पत्रकारांशी बुधवारी संवाद साधला. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरूरे, वाहतूक व्यवस्थापक (प्रभारी) दत्तात्रय झेंडे, जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) सतीश घाटे उपस्थित होते. मिश्रा म्हणाले की, प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली आणि डिजिटल माध्यमाद्वारे काम केले जाणार आहे.

प्रवाशांना मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे बस प्रवासामध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती मिळणार आहे. या सुविधेद्वारे प्रवाशांना त्यांच्या मार्गावरील बसचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे. उत्पन्नवाढीसाठी देखील डिजिटल जाहिरातीवर भर देण्यात येणार असल्याचे मिश्रा म्हणाले. मिश्रा यांनी पीएमपीच्या सर्व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्र्यांची आढावा बैठक घेतली. महामंडळाची बससंख्या, कोरोनामुळे बसलेला फटका, सद्यःस्थितीमध्ये सुरू असलेल्या बस याची माहिती घेतली.

------/------

मिश्रा म्हणाले...

१. बसचे लाईव्ह लोकेशन ते बसमध्ये प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढण्यापर्यंतची ऑनलाईन सुविधा देणार.

२. महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या इतर सोयी - सुविधा ऑनलाईन करणार.

३. खासगी वाहनांचा वापर कमी करून नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीकडे वळविण्यासाठी नियोजन.

४. संचलन तूट येण्याची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यावर काम करणार.