शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

पीएमआरडीएने पाण्याचे स्रोत निर्माण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 03:29 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये एकूण चाळीस टक्के पाणीगळती होत

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये एकूण चाळीस टक्के पाणीगळती होत असून, ही गळती थांबविल्यास शिल्लक पाणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) देता येईल. मात्र, पीएमआरडीएने पाणीसाठ्यांची क्षमता वाढविण्यासाठी स्व:खर्चाने बृहतआराखडा तयार करावा. तसेच स्वत: पाण्याचे स्रोत निर्माण करावेत, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी केली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर बापट यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.बापट म्हणाले, की पुणे जिल्ह्यात पीएमआरडीए स्वत:च्या काही पाणीपुरवठा योजना करत असून, अंदाजपत्रकात त्याकरिता निधीची तरतूद केली आहे. जलसंपदा खात्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय होईल.तलावांमधील गाळ काढणे, बंद जलवाहिनीमधून स्वतंत्र वाहिनी देणे, कालव्यांची दुरुस्ती करणे, धरणाची साठवण क्षमता वाढविणे, अशा माध्यमातून पीएमआरडीएला पाणी देणे शक्य होईल. कोणाचेही पाणी कमी करुन पीएमआरडीएला दिले जाणार नाही. टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम चालू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यातून हिंजवडीसाठी ०.५ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे, असे बापट म्हणाले.