पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) स्थिती सुधारण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मागील पाच वर्षांत फारसे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे पीएमपीचे चाक अजूनही रुतलेल्याच अवस्थेत आहे. प्रवाशांच्या तुलनेत अपुरी बससंख्या, बस पार्किंग व आगारांसाठी जागेचा अभाव, भांडवली गुंतवणुकीकडे दुर्लक्ष अशा विविध मुद्यांकडे सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने न पाहिल्याने ‘पीएमपी’ला ‘बुरे दिन’ आले आहेत.पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे दहा लाख प्रवाशांसाठी दीड हजार बसेसची संख्या खूपच अपुरी आहे. त्यामुळे प्रवाशांना नेहमीच दाटीवाटीने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळते. सध्या पीएमपीला सुमारे ३ हजार बसेसची गरज आहे. यादृष्टीने मागील पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांकडून फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. काही महिन्यांपूर्वी सुमारे दीड हजार नवीन बस खरेदीला हिरवा कंदील मिळाला असला तरी या बस प्रत्यक्ष मार्गावर येण्यास अद्याप बराच कालावधी जावा लागणार आहे. सुमारे ५५० नवीन वातानुकूलित बसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यातील काही बस पुढील एक-दोन महिन्यांत ताफ्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळू शकतो. त्यादृष्टीने नोकरभरतीला सुरुवात झाली आहे.
पीएमपीचे चाक रुतलेलेच
By admin | Updated: January 28, 2017 02:02 IST