शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पीएमपीचे आजारपण सुरूच , बस बंद पडल्याने प्रवासी उन्हात तासभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 03:40 IST

पीएमपीचे आजारपण सुरूच असून, सातारा रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार दुपारी अडीच वाजता सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडीतील लोखंडी पादचारी पूल परिसरात आणि सोमवारी सकाळी साडे करा वाजता स्वामी विवेकानंद स्मारक, पद्मावती परिसरात दोन पीएमपी बस बंद पडून तासभर वाहतूककोंडी झाली.

धनकवडी - पीएमपीचे आजारपण सुरूच असून, सातारा रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार दुपारी अडीच वाजता सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडीतील लोखंडी पादचारी पूल परिसरात आणि सोमवारी सकाळी साडे करा वाजता स्वामी विवेकानंद स्मारक, पद्मावती परिसरात दोन पीएमपी बस बंद पडून तासभर वाहतूककोंडी झाली. त्यामुळे एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला.अहिल्यादेवी चौक ते भारती विद्यापीठ हा चढण मार्ग आहे. या ठिकाणी पीएमपी बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. कात्रज आगार हाकेच्या अंतरावर असूनही बस ओढून मार्गातून बाजूला घेण्याची तत्परता दाखवली जात नसल्यामुळे तासभर वाहतूककोंडीत नागरिकांना अडकून पडावे लागले. असे प्रकार दिवसेंदिवस होत आहेत.उपाय सुरू; पण कोंडी कायमच1 पुणे-सातारा रस्ता पुनर्विकासाच्या कामाची नुकतीच महापौर मुक्ता टिळक यांनी पाहणी केली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ३१ मेपर्यंत काम पूर्ण करून रस्ता कोंडीमुक्त करा, अशा सूचना दिल्या होत्या. महापौरांच्या सूचनेप्रमाणे कामाला काही अंशी गती मिळाली; पण बस बंद पडण्याचे प्रमाण काही थांबलेले नाही. त्यामुळे कोंडीचा त्रास होतच आहे.बीआरटी मार्गातच बस तासभर उभी2 बस भोसरी डेपोची असल्यामुळे आणि ब्रेकडाऊन सेवा भोसरीची येणार असल्यामुळे तब्बल एक तास बस मार्गातच उभी होती.  अरुंद रस्ता, बीआरटी मार्ग,  सद्गुरू शंकरमहाराज उड्डाणपुलावरून आणि पुलाखालून येणारी वाहतूक रस्त्यामध्ये बंद पडलेल्या बसमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नव्या बस देता येत नसतील तर किमान अहिल्या देवी चौक ते भारती विद्यापीठ दरम्यान बंद पडणाऱ्या बस बाजूला घेण्याची स्वतंत्र व्यवस्था उन्हाळ्यात ठेवावी,अशी मागणी नागरिक करीत आहेत.४रविवारी दुपारी अडीच वाजता भोसरी ते कात्रज जाणारी बस बालाजीनगरच्या चढण मार्गात लोखंडी पुलाजवळ बंद पडली. बीआरटी पुनर्रचनेचे काम आणि अरुंद झालेल्या मार्गामुळे वाहनांना पुढे जाण्यास अडथळा होऊन एकच गोंधळ झाला.४रविवारी वाहतूककोंडीचा अनुभव ताजा असतानाच सोमवारी स्वामी विवेकानंद स्मारक, पद्मावती येथे एकाच वेळी बंद पडलेल्या दोन बस आणि ब्रेकडाऊनसाठी आलेली बस यामुळे पुन्हा वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. बीआरटी मार्गामध्ये पीएमपीएल बसची अचानक बंद पडण्याची मालिका चालूच असून, नागरिकांना मात्र उन्हात वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. ही मालिका थांबणार कधी, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे. एक तर बस वेळेत मिळत नाही आणि प्रवास करीत असताना मध्येच अचानक बंद पडल्यामुळे दुसरी बस करावी लागते. बसथांबा जवळ नसेल तर पुढे चालत जाऊन दुसºया बसचालकाला विनंती करावी लागते. पैसे देऊन त्रास सहन करावा लागतो.- नितीन काळे (प्रवासी )कात्रज आगारप्रमुख कुमार थोरवे यांना पीएमपी बंदबाबतविचारले असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.पुणे-सातारा रस्ता अर्बन डिझाइनचे काम चालू आहे. परंतु त्यांनी डिझाइन बनविताना बालाजीनगरमध्ये प्रत्यक्ष पाहणी करायला हवी होती. फुटपाथ, सायकल ट्रॅकमुळे रस्ता अरुंद झाला आहे. बस बंद पडली की अरुंद रस्त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होते. वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूककोंडी कमी व्हावी म्हणून उड्डाणपूल झाला, अर्बन डिझाइन झाले; पण वाहतूककोंडी काय कमी झाली नाही.- गिरीश कदम (वाहतूककोंडीमध्ये अडकलेला नागरिक )पुणे-सातारा मार्गाचे चालू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळे रोज वाहतूककोंडी होत असते. संथगतीने चालणारी वाहतूक,  कडक ऊन आणि बस मध्येच बंद पडल्यामुळे वेळेत कामावर जाता येत नाही. काम वेळेत न झाल्याने चिडचिड निर्माण होते. - योगेश डावळकर (प्रवासी)

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलnewsबातम्या