शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आरामदायी ड्युटीसाठी पीएमपीचे रेटकार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 04:12 IST

चालक-आगारप्रमुखांचे साटेलोटे; चांगली बस, फिक्स-लाईट ड्युटीसाठी आर्थिक देवाणघेवाण

पुणे : अनेकदा विशिष्ट पोलीस ठाणी, विभाग, टेबल मिळविण्यासाठी लॉबिंग केले जाते. हाच ट्रेंड पुणे महानगर परिवहन महामंडळामध्येही सुरू आहे. फिक्स ड्युटीपासून चांगली बस मिळण्यापर्यंत हे लॉबिंग केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी काही आगारप्रमुखांनी रेट कार्डच तयार केले आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यासाठी कर्मचारी एकत्रित आले असून ७० हून अधिक कर्मचाऱ्यांनी अर्जावर सह्याही केल्या आहेत.पीएमपीमध्ये एकूण १३ आगारांमार्फत बस संचलनाचे काम चालते. प्रत्येक आगारासाठी प्रमुख असतात. त्यांच्या अंतर्गत बसचे नियोजन, कर्मचाºयांच्या कामाचे नियोजन, बसची देखभाल-दुरुस्ती अशी विविध कामे असतात. काही कामे कमी श्रमाची असतात. हे काम मिळविण्यासाठी काही कर्मचाºयांकडून आगारप्रमुखांकडे वशिलेबाजी लावली जाते. काही आगारप्रमुख त्याला बळी पडत नाहीत. मात्र, काही आगारप्रमुख त्याचा फायदा उचलत कर्मचाºयांकडे पैशांची मागणी करतात. लाईट ड्युटी, फिक्स डुयटी, रजा मंजुरी, वाशिंग सेंटरवर काम, स्टार्टर ड्युटी यासाठी ‘रेट’ निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे कर्मचाºयांनी लेखी तक्रार करण्याची तयारी केली आहे.एका आगार प्रमुखाविरोधात सुमारे ७० हून अधिक कर्मचाºयांनी या तक्रार अर्जावर सह्या करून कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये पैशांच्या मागणीचा थेट उल्लेख केला आहे. आगारामध्ये फिक्स ड्युटी हवी असल्यास एक महिन्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली जाते. तीनपेक्षा जास्त रजा घ्यायच्या असतील तर एका रजेला २०० रुपये दर आहे. ‘याबाबत लेखी तक्रार अर्ज घेऊन सोमवारी (दि. २९) गुंडे यांच्याकडे गेलो होतो. मात्र, एका बैठकीमुळे त्या भेटू शकल्या नाहीत. आता बुधवारी त्यांच्याकडे तक्रार केली जाईल,’ असे एका कर्मचाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पैसे द्या, चांगल्या बस घ्यापीएमपीमध्ये ब्रेकडाऊनचे प्रमाण जास्त आहे. दररोज १५० हून अधिक बस मार्गावरच बंद पडतात. त्यामुळे चालक व वाहकांना त्रास सहन करावा लागतो. परिणामी सुस्थितीतील बस मिळण्यासाठी चालकांकडून आग्रह धरला जातो. त्यासाठी संबंधित अधिकाºयांकडून पैशांची मागणी होते. अनेक चालक निश्चित केलेल्या बससाठीही आग्रही असतात. पण पैसे न दिल्यास ही बस दिली जात नाही. सुस्थितीत नसलेली बस देऊन चालकांना रवाना केले जाते. असे प्रकार काही आगारांमध्ये घडत असल्याचे काही कर्मचाºयांनी सांगितले. त्यावरून चालक व अधिकाºयांमध्येही वादही होतात. काही वेळा हे वाद विकोपाला गेल्याचे पीएमपीतील कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Bus DriverबसचालकPuneपुणे