शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

असुविधांच्या गर्तेत अडकलीये पीएमपीएमएल

By admin | Updated: March 17, 2017 02:23 IST

कुठे तुटलेल्या खिडक्या तर काही ठिकाणी तुटलेले सीट्स, उन, वारा पाऊस अश्या कुठल्याच गोष्टींपासून संरक्षण होणार नाही अशीच काहीशी परिस्थीती.

पुणे : कुठे तुटलेल्या खिडक्या तर काही ठिकाणी तुटलेले सीट्स, उन, वारा पाऊस अश्या कुठल्याच गोष्टींपासून संरक्षण होणार नाही अशीच काहीशी परिस्थीती. आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर ज्या ठिकाणी आपत्कालीन खिडकी करण्यात आली आहे, तिथे ती उघडण्यासाठी हँडेल नाही. आणि ज्या ठिकाणी आहे ते योग्य वेळी उघडेल का याची खात्री नाही. अश्या एकंदर परिस्थीतीत पुणेकरांना रोज पीएमपीएमएल ने प्रवास करावा लागत आहे. शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना पुणेकरांची एकमेव लाईफ लाईन असलेल्या पीएमपीएमएल बसेसची गुरुवारी लोकमत प्रतिनिधींनी पाहणी केली. या पाहणीतून पीएमपीएमएल बस अनेक समस्यांनी ग्रासली असून, प्रवाशांना प्रवास करताना सुरक्षित न वाटणारं असंच काहीच चित्र समोर आले. नव्याने ताफ्यात दाखल झालेल्या बस वगळता जुन्या बसेसमध्ये अनेक त्रृटी आढळून आल्या. लोकमत प्रतिनिधींनी विविध मार्गांवर प्रवास करुन प्रवाशांशी संवाद साधत पाहणी केली. नियमित बससेवा ,चांगल्या सोयीसुविधा, व चांगल्या बसेस असल्यास बसने प्रवास करण्यास काहीच हरकत नसल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. मेट्रो आणण्याआधीसार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्यात यावा असे मतही अनेकांनी व्यक्त केले.महापालिका ते वाकडेवाडी पर्यंत केलेल्या प्रवासातील बसेसचे सीट्सही तुटलेल्या अवस्थेत होते. तर महिलांच्या बाजूला उभ्या प्रवाशांना पकडण्यासाठी वरील बाजूस हँडेल नव्हते. बसही जुनीच होती. एकीकडे पीएमपीएमलची प्रवासी संख्या दिवसेंदिवस घटत असताना अपुऱ्या सोयिसुविधांमुळे व बस मधून प्रवास करताना सुरक्षित वाटत नसल्याने पुणेकर पीएमपीएमएल कडे पाठ फिरवताना दिसत आहेत. सततचे ब्रेक डाऊन, तुटलेल्या सीट्स, बसेसची झालेली दुरावस्था, बसेसच्या वेळांमध्ये नसलेली नियमितता या सर्वांना नागरिक त्रासले असून बसने प्रवास करण्याऐवजी स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्यावर ते भर देत आहेत.