शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी बसला ‘निळी’ झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:36 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) लाल बसेसला आता ‘निळी’ झळाळी मिळणार आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) लाल बसेसला आता ‘निळी’ झळाळी मिळणार आहे. ताफ्यात दाखल होणा-या नवीन तसेच भाडेतत्त्वावरील बसेसला निळा रंग देऊन त्यावर पाना-फुलांचे आकार साकारले जाणार आहेत. या कामाला सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने रंगरंगोटीचे काम पूर्ण केले जाणार आहे.‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या ६५३ बस भाडेतत्त्वावरील, तर २०० बस पीपीपी तत्त्वावरील आहेत. तर जवळपास एक हजार बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. ‘जेएनएनयुआरएम’ अंतर्गत पीएमपीला मिळालेल्या बस वगळता बहुतेक सर्व बसेसचा रंग लाल असून त्यामध्ये पिवळ््या रंगाचे पट्टे आहेत. तर ‘जेएनएनयुआरएम’च्या बसेसचा रंग पांढरा व गुलाबी रंगाचे पट्टे असलेल्या आहेत. मागील वर्षी पीएमपी प्रशासनाने ताफ्यात दाखल होणाºया नवीन बसेससाठी यापेक्षा वेगळा रंग देण्याची कल्पना पुढे आणली होती. बीआरटी व इतर मार्गांवरील नवीन बसेससाठी स्वतंत्र रंगसंगती असावी, हा त्यामागचा उद्देश होता. त्यानुसार तीन वेगवेगळ््या रंगछटा असलेल्या बसेसचा नमुना तयार करण्यात आला होता. या तीन नमुन्यापैकी एक नमुना निश्चित करण्यासाठी पुणेकर नागरिकांकडून त्यावर मतदान घेण्यात आले. त्यासाठी पर्याय क्रमांकानुसार टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार झालेल्या मतदानामध्ये पुणेकरांनी निळा रंग व त्यावरील पाना-फुलांच्या आकारातील पर्यायाला पसंती दिली होती. त्यानुसार प्रशासनाने ही रंगरंगती निवडली. त्यामध्ये संपूर्ण बसला निळा रंग असून त्यावर पाना-फुलांचे आकार असतील. त्यावर इंद्रधनुष्य लिंक असे मराठी व इंग्रजीमध्ये लिहिलेले व त्याचा लोगो असेल.‘पीएमपी’तील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीच्या ताफ्यात लवकर नवीन मध्यम आकाराच्या २०० बस दाखल होणार आहेत. या बसेसला हीच रंगसंगती निश्चित करण्यात आली असून या बसेस सज्ज झाल्या आहेत. लवकरच त्या ताफ्यात दाखल होणार आहेत. सुरुवातीला केवळ या बसेसलाच हा रंग देण्याचे ठरले होते. पण भाडेतत्त्वावरील बसेसला दोन ते अडीच वर्षांनी नवीन रंग देण्याबाबत करारात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार आता भाडेतत्त्व व पीपीपीवरील बस पासिंग करून घेताना या नवीन रंगसंगतीमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.