शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीला लागतो ‘दे धक्का!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 03:10 IST

गेल्या काही दिवसांपासून पीएमपी बसेस ठिकठिकाणी बंद पडत असल्याने ‘दे धक्का’चे तंत्र प्रवाशांना म्हणावे लागत आहे

हडपसर : गेल्या काही दिवसांपासून पीएमपी बसेस ठिकठिकाणी बंद पडत असल्याने ‘दे धक्का’चे तंत्र प्रवाशांना म्हणावे लागत आहे. शनिवारी चौकात सकाळी पावणेदहा वाजता बस बंद पडल्यामुळे प्रवाशांनाच ‘दे धक्का’ म्हणत बस ढकलून रस्त्याच्या बाजूला घेण्याची वेळ आली.मगरपट्टा चौकात सकाळी ९.४३ वाजता पीएमपी बस बंद पडली. दुचाकी-चारचाकी वाहनांची खच्चून गर्दी होती. वाहनचालकांनी कर्णकर्कश हॉर्न वाजवायला सुरुवात केली. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी खाली उतरून बस ढकलत पुढे नेली आणि वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला. वारंवार बस बंद पडत आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालय, चाकरमानी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पुण्याची वाहिनी म्हणून पीएमपीकडे पाहिले जात असले तरी, त्याचे गांभीर्य प्रशासनाला नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली.पीएमपीची वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे सामान्य कामगारांनीसुद्धा स्वत:चे वाहन वापरणे पसंत केले आहे. रस्ते मात्र तेवढेच असले तरी वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची खच्चून गर्दी, कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा प्रत्येकाला त्रास सहन करावा लागत आहे.सहाआसनी रिक्षाचालकांनी प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचे कार्य सुरू केले. त्या वेळी पीएमपीच्या बसेस रिकाम्या धावू लागल्या. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने अनेक फतवे काढले. त्यामध्ये ‘सुखकर प्रवास पीएमपी बसचा प्रवास’ असे घोषवाक्य तयार केले. त्याशिवाय पीएमपीच्या प्रमुख थांब्यावर स्पीकरवरून प्रवाशांना पीएमपी बसने प्रवास करा, असे आवाहन केले जात होते. बसमध्ये सुमधुर गीतेही प्रवाशांना ऐकविली जात होती. झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेली बस दाखवा आणि बक्षीस मिळवा, तसेच पीएमपी बसवर नामफलक नसलेल्या बस दाखवा आणि बक्षीस मिळवा या योजना बासनात गुंडाळल्या गेल्या आहेत. मात्र, गर्दी आणि प्रदूषणाचे कारण दाखवत सहाआसनी रिक्षांना शहराबाहेर काढले आणि पीएमपीचे पुन्हा पहिले पाढे सुरू झाले. वारंवार बंद पडणाऱ्या पीेएमपीची सेवा सुरळीत कधी होणार, असा खडा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. हडपसर ते कात्रज जाणारी बस नेहमीच खराब असतात, रस्त्यात बंद पडतात, सकाळची पहिली ट्रीपला बसला बिघाड ठरलेला असतोच.प्रवाशांना रोजच होतो मनस्तापरस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, खासगी वाहनांचा वापर टाळा, पीएमपीने प्रवास करा, असा नारा दिला जात आहे. मात्र, पीएमपीच्या बसेसठिकठिकाणी बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.सकाळी कामावर जाण्याची घाई, वेळेवर पोहोचलो नाही, तर बिनपगारी होण्याची भीती, बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नाही, तरीसुद्धा प्रवासी पीएमपीने प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :Puneपुणे