शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या पाट्यांना मिळेना जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 05:46 IST

बहुतांश बसमधील स्थिती : रात्रीच्या वेळी प्रवाशांना बस ओळखणे अवघड

पुणे : पीएमपीचा मार्ग सांगणाऱ्या पाट्या प्रवाशांना दिसतील अशा जागी लावणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर त्या पाट्यांवर रात्रीच्यावेळी प्रकाश असणेसुद्धा आवश्यक आहे. परंतु पीएमपीच्या बहुतांश बसेसच्या पाट्या या खाली बसच्या काचेच्या येथे लावण्यात येतात. त्याचबरोबर त्यावर रात्रीच्यावेळी प्रकाशही नसतो. त्यामुळे प्रवाशांना रात्रीच्यावेळी कुठल्या मार्गावरील बस आहे, हे समजणे अवघड जात असल्याचे चित्र आहे.पीएमपी ही पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक सेवा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवासी पीएमपीने प्रवास करीत असतात. सुरुवातीपासूनच सक्षम वाहतूक व्यवस्था पुरविण्यात पीएमपी प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र आहे. मधल्या काळात तुकाराम मुंडे यांनी ही व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता पुन्हा परिस्थिती बदलत असल्याचे चित्र आहे.बस ज्या मार्गावर धावत आहे, त्या मार्गाची पाटी ही प्रवाशांना दिसेल अशा भागात लावणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर रात्रीच्यावेळी त्यावर प्रकाश असणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रवाशांना बस कुठली आहे, हे कळण्यास मदत होईल. परंतु पीएमपीच्या अनेक जुन्या बसेसच्या पाट्या या चालकाच्या शेजारील काचेच्या येथे खालच्या भागात लावण्यात येत असल्याने प्रवाशांना कुठल्या मार्गावरील बस आहे, हे समजणे अवघड जात आहे. खासकरून रात्रीच्यावेळी कुठली बस आहे, हे लांबून कळत नाही. बसजवळ आल्यानंतरच त्यावरील पाटी वाचता येते.अनेकदा बसवरील पाटी अंधारात वाचता येत नसल्याने प्रवासी बसच्या समोर येत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच अनेकदा कुठली बस आहे, हे कळत नसल्याने बस चुकण्याचेही प्रकार घडत असतात.४रूपा भुतके ही तरुणी म्हणाली, अनेक बसेसच्या पाट्या या खालच्या भागात लावण्यात येत असल्याने त्या पटकन दिसत नाही. या पाटीवर लाईटही नसते. तसेच बसच्या प्रखर लाईटमुळे ही पाटी वाचताही येत नाही. त्यामुळे बस जवळ आल्याशिवाय ती कुठल्या मार्गावरील बस आहे, हे समजत नाही.४बसवरील पाटी वाचता न आल्याने अनेकदा बस चुकली आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने योग्य ठिकाणी पाटी लावून त्यावर लाईट लावायला हवी. नाव न छापण्याच्या अटीवर पीएमपीचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, नव्या बसेसला एलईडी स्क्रीन असल्याने त्यांच्या पाट्यांचा प्रश्न येत नाही.४ज्या बसेसला एलईडी स्क्रीन नाही त्या बसेसच्या पाट्यांवर आम्ही येत्या काळात लाईट लावण्याची व्यवस्था करणार आहोत. तसेच जे चालक एलईडी स्क्रीन सुरु करत नाहीत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएल