शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या सत्रामुळे पीएमपी कर्मचारी नाराज

By admin | Updated: May 22, 2017 06:46 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये (पीएमपी) विविध कारणांसाठी कर्मचाऱ्यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या सत्रामुळे कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी पसरली आ

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये (पीएमपी) विविध कारणांसाठी कर्मचाऱ्यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या सत्रामुळे कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. मागील काही वर्षांत पीएमपीला खिळखिळी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गैरवर्तन व कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे. याबाबत कर्मचारी उघडपणे नाराजी व्यक्त करीत नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर होत नसलेल्या कारवाईबद्दल सवाल उपस्थित केले आहेत. त्यामध्ये पीएमपीतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. ही माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खालील अधिकाऱ्यांना हाताशी धरून भ्रष्ट वाहकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना क्लीन चिट दिली व किरकोळ एखाद्या केस असणाऱ्या अनेक सेवकांना अन्याय करून बडतर्फ केले, असे नमूद करण्यात आले आहे. अनेक सेवकांच्या, अधिकारी भरती व बढतीमध्ये लाखो रुपयांचा अपहार, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालून कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला. बस ठेकेदार यांच्याशी संगनमताने करार करून वार्षिक ३०० कोटी रुपयांचे नुकसान केले. यांसह विविध प्रकारचे आरोप यामध्ये करण्यात आले आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) भांडार विभागातील क्वालिटी कंट्रोलर अनंत वाघमारे यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. बससाठी मागविण्यात आलेल्या सुट्ट्या भागांची तपासणी योग्य प्रकारे न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पहिल्या दिवसापासून कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. एक दिवसाचे कमी वेतन, दंड, निलंबन, बडतर्फी अशा विविध प्रकारच्या कारवाईचा धडाका अजूनही सुरूच आहे. वाघमारे यांनी क्वालिटी कंट्रोलर अधिकारी असताना इंजिन व गिअर बॉक्सला जोडणाऱ्या इनपुट शाफ्टची तपासणी करून बरोबर असल्याचा शेरा मारला. मात्र हे इनपुट शाफ्ट बसला बसले नाही. त्यामुळे सुट्या भागांची योग्यप्रकारे तपासणी न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यानुसार शनिवारी त्यांचे निलंबन करण्यात आले. मुंढे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी वाघमारे यांच्याकडे वाहतूक व्यवस्थापक (संचलन) आणि महाव्यवस्थापकपदाचा भार होता. मात्र महिनाभरापूर्वी मुंढे यांनी त्यांची क्वालिटी कंट्रोलर या तृतीय श्रेणीच्या पदावर बदली केली होती.