शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या विचारांच्या नांगराने बंजर डोकी नांगरा! विश्वास पाटलांची राजकीय नेत्यांवर टीका

By श्रीकिशन काळे | Updated: October 6, 2023 15:45 IST

वसंत बापट जनशतवार्षिकी परिसंवाद...

पुणे : ‘‘वाघनखं भारतात आणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे नांगर तुमच्या सुपीक डोक्यातून फिरवा. कारण वाघनखांपेक्षा शिवरायांचे विचार हे अधिक धारदार आहेत. शिवरायांच्या विचारांच्या नांगराचा फाळ घ्या आणि आपले बंजर डोकी नांगरून टाका,’’ असे आवाहन ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी केले.साहित्य अकादमी व साधना ट्रस्टच्या वतीने एस. एम. जोशी सभागृहात कवी वसंत बापट जनशतवार्षिकी परिसंवादाच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी साहित्यिक भारत सासणे, साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव, नरेंद्र पाठक, विनय हर्डीकर उपस्थित होते. उद‌्घाटनसत्रानंतर प्रथम सत्र प्रमोद मुनघाटे, इंद्रजित भालेराव, किशोर कदम, नीलिमा गुंडी यांचे झाले.

पाटील म्हणाले,‘‘१९९९ मध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवीराज वसंत बापट होते. तेव्हा त्यांचा एका ठिकाणी होता. तेव्हा लेखक व स्वातंत्र्या या विषयावर खडे बोल सुनावले होते. ते म्हणाले, सरकारने जरी संमेलनाला २५ लाख रूपये दिले असले, तरी आम्ही आमचा आत्मा विकणार नाही. त्यांनी २५ लाख काय २५ कोटी दिले तरी आम्ही आमचा आत्मा विकायला काढलेला नाही, अशा कणखर विचारांचे बापट होते. बापट यांचे मराठीवरील प्रीती आणि प्रेम अचाट होते.’’टीचभर समीक्षकांचे बोलणं गैर-

‘‘वसंत बापट यांच्यावरी कार्यक्रमासाठी मला साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांचा फोन आला. ते म्हणाले, वसंत बापट यांच्या कार्यक्रमासाठी दोन-चार समीक्षकांना फोन केले. परंतु, त्यांनी यायला नकार दिला आणि एक दबक्या आवाजात सांगितले की, वसंत बापट हे काय कवी आहेत ? किमान पाडगावकरांच्या दर्जाचे असते तरी आम्ही वेळ घालवला असता. असं जर सो कॉल्ड टीचभर समीक्षक बापटांविषयी बोलत असतील, तर हे गैर आहे. ’’ यामुळे मला झोप लागली नाही. त्यामुळे मी या कार्यक्रमाला खास बोलायला आलो, असे विश्वास पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड