शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

नाटकाचे ‘पालकत्व’ घ्यावे

By admin | Updated: February 5, 2016 02:21 IST

महाराष्ट्रामध्ये बोलीभाषांमध्ये नाटक होण्याचे प्रमाण कमी आहे. यासाठी बोलीभाषेमध्येच नाटके लिहून घेऊन त्याच्या स्पर्धा आयोजित कराव्यात आणि त्यातील विजेत्या नाटकाचे खासदाराने

पुणे : महाराष्ट्रामध्ये बोलीभाषांमध्ये नाटक होण्याचे प्रमाण कमी आहे. यासाठी बोलीभाषेमध्येच नाटके लिहून घेऊन त्याच्या स्पर्धा आयोजित कराव्यात आणि त्यातील विजेत्या नाटकाचे खासदाराने पालकत्व घेऊन त्याचे राज्यभर दौरे करावेत, अशी अपेक्षा नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा, रोटरी क्लब आॅफ पुणे रॉयल आणि निळू फुले कला अकादमीच्या वतीने ठाणे येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचा ज्येष्ठ अभिनेते आणि माजी संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. व्यावसायिक, प्रायोगिक आणि बालरंगभूमी असलेल्या त्रुटींची माहिती देणे आणि तालमीसाठी शाळांचे हॉल उपलब्ध करून देणे, सामानासाठी अथवा नाट्य संस्थेच्या वाहनांसाठी उड्डाणपुलाच्या खालची जागा वापरण्यास परवानगी देणे यासंबंधीची विनंती सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्याकडे करणार आहे. सत्काराला उत्तर देताना कधीही शाळेची पायरी न चढलेला एक मुलगा अध्यक्षपदापर्यंत जाऊन पोहोचला, ही केवळ रसिकांची पुण्याई आहे. सज्जनांच्या घरी जाऊन जी माधुकरी मागितली तेच माझे यश आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘नाटक आणि कीर्तन ही सांस्कृतिक भूक आहे, एकदा तोंडाला रंग लागला की तो लावावाच लागतो, ती एक ऊर्मी आहे, नाटक हे व्यसन आहे, ते कधीही सुटणार नाही, नाटकांना चांगले दिवस नक्कीच येतील.ज्येष्ठ रंगकर्मी मधुवंती दांडेकर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, रोटरीचे जयंत रजपूत, वर्षा जोगळेकर, मेघराज राजेभोसले उपस्थित होते. सत्कार सोहळ्यानंतर ‘कलाकार तुमच्या भेटीला’ उपक्रमांतर्गत मधुवंती दांडेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. (प्रतिनिधी)